Share

Travel Guide | ‘हे’ 5 हिंदी भाषिक देश फिरण्यासाठी ठरतील सर्वोत्तम ठिकाणं

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा आहे. त्यामुळे देशात तुम्ही कुठेही फिरायला गेले तर तुम्हाला हिंदी भाषेमुळे तेथे वावरणे सोपे होते. कारण हिंदी भाषा ही देशात सर्वत्र बोलली आणि समजली जाते. त्यामुळे आपण देशात कुठेही फिरू शकतो. पण कुठे परदेशात फिरायला जायचं म्हटलं तर आपल्यासमोर नेहमी भाषेचं मोठं प्रश्नचिन्ह उभ राहतं. पण आज आम्ही तुम्हाला असे काही देश सांगणार आहोत जिथे हिंदी भाषा बोलली आणि समजली जाते. त्याचबरोबर ती फिरण्यासाठी देखील सर्वोत्तम ठिकाणी आहे. या देशांमध्ये फिरायला गेल्यास तुम्हाला भाषेची अजिबात समस्या निर्माण होणार नाही कारण तिथे हिंदी भाषा व्यवस्थित रित्या बोलली आणि समजली जाते. हे देश निसर्ग सौंदर्याने नटलेले असून फिरण्यासाठी चांगली ठिकाणं आहेत.

फिजी

फिजी हा एक हिंदी भाषा मान्यताप्राप्त देश आहे. फिजी मध्ये हिंदी भाषा स्थानिक पातळीवर ‘हिंदुस्थानी’ म्हणून ओळखली जाते. हा देश निसर्ग सौंदर्याने नटलेला असून इथे समुद्रकिनारे, हिंदू मंदिरे आणि हिरवीगार जंगले आहेत. फिजी देशाची राजधानी असलेल्या सुवा हे शहर संग्रहालय आणि उद्याने यांसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला हिंदी भाषा चांगली येत असेल तर तुम्ही फिजी देशात भाषेच्या कोणत्याही तणावाशिवाय करू शकता.

मॉरिशियस

मॉरिशियस एकेकाळी ब्रिटिश राजवटीत होते, त्यांनी तेथे अनेक भारतीयांना नेले होते. त्यामुळे मॉरिशसमध्ये देखील अनेक हिंदी भाषिक लोक आहेत. फिरण्यासाठी मॉरिशियस हे एक सर्वोत्तम ठिकाण आहे. इथे तुम्हाला भाषेची फारशी समस्या येणार नाही.

नेपाल

भारताच्या शेजारीच असलेला नेपाल देश काही काळापर्यंत हिंदू राष्ट्र म्हणूनच ओळखला जात होता. नेपाळमध्ये हिंदी भाषेचा समावेश बोली भाषेमध्ये होतो. संस्कृती आणि धर्मासाठी नेपाळ हा सुप्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला अनेक मंदिर आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या गोष्टी बघायला मिळतील.

बांगलादेश

आशिया खंडातील एक सुंदर देश म्हणून बांगलादेशाची ओळख आहे. सहजपणे हिंदी भाषा येत असलेल्यांना बांगलादेशमध्ये कोणती अडचण निर्माण होणार नाही. इथे तुम्हाला बेटे, किल्ले, जंगले आणि जुनी संग्रहालय बघायला मिळतील. बांगलादेश देशाची राजधानी असलेल्या ढाका शहरांमध्ये देखील तुम्हाला अनेक ऐतिहासिक गोष्टी बघायला मिळतील.

सिंगापूर

सिंगापूर हा एक असा देश आहे जिथे भारतातून आणि जगभरातून बरेचसे लोक शिक्षण घेण्यासाठी जातात. या देशामध्ये देखील तुम्हाला अनेक हिंदी भाषिक लोक आढळतील. सिंगापूर हे एक फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. इथे तुम्हाला बॉटनिकल, गार्डन युनिव्हर्स स्टुडिओ अशी अनेक चांगले ठिकाणी बघायला मिळतील.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!