पुणे : राज्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच मुंबईत आता कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांची दिवसभरातील संख्या २० हजारांवर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन करावाच लागेल. असा इशारा मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल(Iqubal chahal) यांनी दिला आहे. त्यातच आता पुण्यातही निर्बंध अजून कडक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अधिकचे निर्बंध लावण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या(Ajit Pawar) बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी माहिती पुणे महापौर मुरलीधर मोहोळ(Murlidhar Mohol) यांनी दिली आहे.
याच मुद्द्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी खोचक टोला लगावला असून यासंदर्भात ट्विट करत ते म्हणाले आहेत की,’पुण्यातील निर्बंधांबाबत अजित पवार बैठकीत निर्णय घेतील असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे हे मुंबईचे मुख्यमंत्री आहेत आणि अजित पवार हे पश्चिम महाराष्ट्राचे. त्यामुळे साहजिकच पुण्यातील निर्बंधांबाबत अजित पवारच निर्णय घेणार’, असे भातखळकर म्हणाले आहेत.
पुण्यातील निर्बंधांबाबत अजित पवार बैठकीत निर्णय घेतील असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे हे मुंबईचे मुख्यमंत्री आहेत आणि अजित पवार हे पश्चिम महाराष्ट्राचे. त्यामुळे साहजिकच पुण्यातील निर्बंधांबाबत अजित पवारच निर्णय घेणार. pic.twitter.com/hvu6Tu9lmH— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 4, 2022
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही बैठक आज(४ जाने.) साडे चार वाजता होणार असून या बैठकीत कोरोना रुग्णसंख्या, लसीकरण याबाबत चर्चा करून निर्बंध अजून कडक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संजय राऊतांनी गोव्यात घेतली काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- ‘माफी मागितली की आपण नवीन घोळ घालायला मोकळे असंच ना?’, भातखळकरांचे टीकास्त्र
- अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती
- ‘..तरी चीनचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांबरोबर फाफडा, ढोकळा खाताना दिसतील’, संजय राऊतांचा टोला
- ‘…पण अखेर त्याने मला गाठलंच’, पॉझिटिव्ह आल्यानंतर रोहित पवार यांची भावनिक पोस्ट


