🕒 1 min read
मुंबई : काल शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा पार पडला. संपुर्ण राज्याचं लक्ष वेधलेल्या हा मेळावा दोन्ही ठिकाणी झाला. एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर तर उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर. यावेळी दोन्ही गटाने एकमेकांवर टीपा-टिप्पणी केल्या. यावेळी एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावरन मुख्यमंत्री पदावरून हल्लाबोल केला.
काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
बीकेसीवरील दसरा मेळाव्यात बोलताना शिंदे म्हणाले, लाज तुम्हाला वाटायला हवी होती. बाळासाहेबांच्या विचारांना तोडून मोडून तुम्ही सत्ता मिळवली. छातीवर दगड ठेवून मी तुमच्यासोबत राहिलो. मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती. बाळासाहेब असते तर हा मुख्यमंत्री झाला नसता हे नारायण राणेंनी सांगितलं. मी पुढचं काही बोलणार नाही. हा अधिकार राणे साहेंबाना आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या प्रत्येक टीकेला उत्तर दिले आहे. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचा कट्टाप्पा म्हणून उल्लेख केला होता. याला शिंदेंनी प्रत्युत्तर केलं आहे. मी रुग्णालयात असताना कट्टाप्पा कट करत होता, असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला होता. यावर कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता, असा पलटवार एकनाथ शिंदेंनी केला आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो, माझी बोटंही हलत नव्हती, शरीर निश्चल पडलं होतं, तेव्हा ज्यांच्यावर मी जबाबदारी दिली होती, ते कटाप्पा.. म्हणजे कट करणारे अप्पा ते कटाप्पा.. ते कट करत होते की हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही. पण त्यांना कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. तुम्ही आई जगदंबेच्या शक्तीशी पंगा घेतला आहे. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही, तेजाचा शाप आहे तो, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री, कार्ट खासदार.. कुणाचा आमदार.. पुन्हा डोळे लावून बसलेत की नातू नगरसेवक होणार. अरे त्याला मोठा तर होऊ दे. पण यांचं सगळं ध्येय काही एकच.. सगळं माझ्याकडेच हवंय. मी मुख्यमंत्री का झालो होतो? भाजपानं पाठीत वार केला म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली होती. ज्यांना आपण सगळंकाही दिलं, मंत्रीपदं दिली, आमदारक्या, खासदारक्या दिल्या, ते नाराज होऊन गेले. असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “मोहन भागवतांनी हिंदूत्व सोडलं की,…”; उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांवर हल्ला
- Eknath Shinde | “त्याला हार्ट अटॅक आला असता” ; एकनाथ शिंदेंनी सांगितला उद्धव ठाकरेंसोबतचा ‘तो’ किस्सा
- Uddhav Thackeray । शिवसेनाप्रमुख व्हायची लायकी आहे का?; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल
- Eknath Shinde | “काँग्रेसचा राक्षस गाडा, राष्ट्रवादी हरामखोर पक्ष…” ; एकनाथ शिंदे गरजले
- Eknath Shinde | “कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता” ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
