Share

Eknath Shinde | “काँग्रेसचा राक्षस गाडा, राष्ट्रवादी हरामखोर पक्ष…” ; एकनाथ शिंदे गरजले

Published On: 

मुंबई : शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन ठिकाणी दसरा मेळावा झाला. शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली. त्याचवेळी बीकेसी ग्राऊंडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला ठाकरे कुटुंबातील अनेकांनी हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे जुने वक्तव्य सांगत, काँग्रेस – राष्ट्रवादीला देखील धारेवर धरले.

एकनाथ शिंदे म्हणाले, “काँग्रेसचा राक्षस गाडा, राष्ट्रवादी हरामखोर पक्ष आहे. ते जिथे खाजवतील तिथून पैसे काढतील. पैसे खाऊन यांची पोटं भरत नाहीत, अशा ठाकरी शैलीत बाळासाहेब प्रहार करत होते.”

तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला-

एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. ते आम्ही अभिमानाने छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले. आम्हाला बाप चोरणारी टोळी निर्माण झाली म्हणता . अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं का? सहन करण्याची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण?”

२०१९ सालीच गद्दारी झाली-

एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात भाषण देताना शिंदेंनी गद्दारीचं स्पष्टीकरण दिलं आहे. होय झाली गद्दारी, २०१९ सालीच गद्दारी झाली, जेव्हा महाविकास आघाडी घडली तेव्हाच गद्दारी झाली, असा जोरदार हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी यावेळी केला आहे.

आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्मपरिक्षण करा, असा इशारा देखील शिंदेंनी दिला आहे. आम्ही नाही तर तुम्ही गद्दार आहात, असा घणाघात देखील त्यांनी केला आहे. तसेच मविआसोबत गेला तेव्हा तुम्ही राजीनामे दिले होते का, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे.

“मी रुग्णालयात असताना कट्टाप्पा कट करत होता, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. यावर कटप्पा स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता”, असा पलटवार एकनाथ शिंदेंनी केला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे-

मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो, माझी बोटंही हलत नव्हती, शरीर निश्चल पडलं होतं, तेव्हा ज्यांच्यावर मी जबाबदारी दिली होती, ते कटाप्पा.. म्हणजे कट करणारे अप्पा ते कटाप्पा.. ते कट करत होते की हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही. पण त्यांना कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. तुम्ही आई जगदंबेच्या शक्तीशी पंगा घेतला आहे. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही, तेजाचा शाप आहे तो, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!