Share

Eknath Shinde । “राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही, त्यामुळे त्यांनी…”; मुख्यमंत्री शिंदेंचा सल्ला

Published On: 

Eknath Shinde । मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेलं आहे. त्यात आता आणखी वाढ झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुंबई आणि महाराष्ट्रासंदर्भात केलेलं वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आलं आहे. कोश्यारी म्हणाले कि, महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यानंतर मुंबई, ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, अस वादग्रसत्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेध करत अनेक प्रतिक्रिया येत आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले कि, राज्यापालांचं विधान वैयक्तिक, त्याच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबई मिळाली. बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहीत आहे. उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा केला. राज्यपालांनीही खुलासा केला आहे. राज्यपाल हे मोठं पद आहे. संविधानिक पद आहे. त्यामुळे कुणाचा अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मराठी माणसाच्या त्याग आणि योगदानाची अवहेलना करता येणार नाही, असा सल्ला त्यांनी माध्यमाशी बोलताना दिला.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सावध प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासात आणि वाटचालीत मराठी माणसाचं योगदान खूप मोठं आहे. राज्यपालांनाही याची जाणीव असावी. मात्र एखाद्या विशेष कार्यक्रमात आपण अतिशयोक्ती अलंकार वापरतो, त्या स्थितीतून राज्यपालांचं वक्तव्य आलं असावं. याबद्दल ते स्वतः स्पष्टीकरण देतील, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!