Share

Eknath Shinde | छगन भुजबळांच्या सरस्वतीवरील वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

नाशिक : राज्यात अनेक घडामोडी घडत असतात. त्यावरून राजकीय वातावरणामध्ये बदल होत असतो. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरून सत्ताधारी पक्षनेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधायला सुरूवात केली आहे. इतक्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुजबळांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

कुठलेही फोटो काढले जाणार नाहीत. कुणाला काहीही वाटेल. त्यांना वाटेल ते आम्ही करणार नाही. जे लोकांना वाटतं तेच आम्ही करणार आहोत, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ यांना चांगलंच सडेतोड उत्तर दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, या स्वामीनारायण मंदिराच्या भूमिपूजनालाही मी आलो होतो. मी मुख्यमंत्री असताना मला संधी मिळाली हा योगायोग आहे. त्यासाठी मी खूप समाधानी आहे. तीन वर्षात हे भव्यदिव्य मंदीर निर्माण झालं. हे एक मोठं काम स्वानारायण मंदिराबाबत झालं आहे.

छगन भुजबळ यांचे वक्तव्य –

सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी एका भाषणामध्ये केलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!