मुंबई : राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. एकनाथ शिंदेंच्या चारचाकीला वाशी टोलनाक्याजवळ अपघात झाला. या अपघातात ते थोडक्यात बचावले असून त्यांच्या हाताला मार लागला व अंगठ्याला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.
गुरुवारी मुंबईच्या दिशेने येत असताना वाशी टोलनाका ओलांडल्यानंतर काही अंतरावरच हा अपघात झाला. एकनाथ शिंदे यांच्या टोयटा एसयुव्ही गाडीला गुरुवारी 24 डिसेंबर रोजी नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर अपघात झाला. या अपघातात गाडीच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या या अपघातामुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
त्यांच्याबाबत अंधश्रद्धेपोटी काही दिवसांपूर्वी केलेलं कृत्य उघडकीस आलं होतं. यानंतर स्वतः एकनाथ शिंदेनी, ”अशा अघोरी घटना होतात त्यावर विश्वास ठेवायची गरज नाही. अशा प्रवृत्ती आहेत त्यावर पोलिसांमार्फंत कारवाई केली आहे. अशा कृत्याने कोणतीही गोष्ट घडत नसते, समाजाने अशा पासून सावध राहिले पाहिजे’ अशी प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, या घटनेचा त्यांच्या अपघाताशी काहीही संबंध नसून कोणीही अंधश्रद्धा बळावेल असं कृत्य करू नये. असे कृत्य कायद्याने गुन्हा आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यातील शेतकरी संवाद यात्रेत फडणवीस झाले बैलगाडीवर स्वार!
- ‘…पण देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार’
- तळेगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानाचं आ. शेळकेंच्या पुढाकाराने होणार स्मारक!
- मनसेचा दणका ऍमेझॉनला, शहाणपण फ्लिपकार्टला!
- शेतकऱ्यांना ‘आवळा’ देऊन उद्योगपती मित्रांना ‘कोहळा’ देणारी योजना!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

