Share

Eknath Shinde | वेदांता प्रकल्प गुजरातला कसा गेला?, एकनाथ शिंदे म्हणाले…

Published On: 

मुंबई : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसतं आहे. हा प्रकल्प गेल्यामुळे राज्यातील जवळपाल दीड-लाख तरूणांचा रोजगार गेला आहे. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेत्यांकडून सत्ताधारी पक्षनेत्यांवर आरोप, टीकेबाजी केल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीमधील नेते हा प्रकल्प महाराष्ट्रातून जाण्यामागे राज्य सरकारला जबाबदार ठरवतं आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांता प्रकल्प गुजरातला कसा गेला? हे सांगितले आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

विरोधी पक्षनेत्यांकडून वेदांता प्रकल्प राज्य सरकारवरमुळे गेला, असा आरोप केला जात आहेत. परंतू मागील सरकारकडून दीड ते दोन वर्षांपामध्ये कंपनीला जो प्रतिसाद मिळायला हवा होता तो मिळाला नाही, सहकार्य मिळालं नाही. त्यामुळे कंपनीने प्रकल्प गुजरातला देण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबईमध्ये एका कार्यक्रमाच्यावेळी एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी याविषयी भाष्य केलं आहे. पुढे ते बोलताना असंही म्हणाले की, हा प्रकल्प राज्यातून गेल्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा केली. महाराष्ट्रात मोठे उद्योग आले पाहिजेत, रोजगार निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी मोठे उद्योग आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन मोदींनी दिलं आहे.

तसेच, आम्ही महाराष्ट्रात परिवर्तन केलं. मागील दोन महिन्यांत आम्ही ७०० निर्णय घेतले. सर्व क्षेत्रातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आम्ही सर्व क्षेत्रातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून, शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!