गडचिरोली : नगरविकास मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नक्षली भागातील पोलीस महिलांशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. नक्षली कारवायांचे केंद्र असलेल्या अतिसंवेदनशील एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथिल पोलीस आउटपोस्टला शनिवारी भेट दिली.
एकनाथ शिंदे यांनी नक्षली भागातील पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस, पोलीस कुटुंबातील महिला आणि स्थानिक आदिवासी महिलांकडून राखी बांधून घेत राखीपौर्णिमा साजरी केली. यावेळी उपस्थित महिलांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या. राज्यभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्सहात साजरी होताना दिसत आहे.
नक्षली कारवायांचा धोका पत्करून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधव आणि भगिनींना ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले, तसेच त्यांना कर्तव्य बजावताना येणाऱ्या सर्व समस्या सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल आणि सर्व पोलीस बांधव त्यांचे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- राणेंना ठोकम ठोकी करायची सवय; विनायक राऊतांचे ‘त्या’ टीकेला सडेतोड उत्तर
- दानवे राहुल गांधींना ‘सांड’ म्हणाले, यशोमती ठाकुरांनी घेतले फैलावर…
- आगामी निवडणुका महाविकास आघाडी सोबत लढणार ?, बाळासाहेब थोरातांचे मोठे विधा
- खिलाडी कुमारच्या धाडसाला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद
- टीम डेव्हिड ठरणार आयपीएल खेळणारा सिंगापूरच्या पहिलाच खेळाडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

