मुंबई : शिंदे सरकारने आज विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. सरकारच्या बाजूने 164 मते पडली तर विरोधात 99 मते पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास शैलीत सभागृहाला संबोधीत केले. यावेळी त्यानी विरोधकांच्या टिकेचा देखील समाचार घेतला. तसेच २०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर मला मुख्यमंत्री करण्याचं ठरलं होतं, असा मोठा खुलासा देखील एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, “सुरुवातीला मला मुख्यमंत्री करण्याचे ठरले होते. नंतर कुणीतरी सांगितलं मी नको, उद्धव ठाकरेंना करा. मी काहीही बोललो नाही. मला सत्तेची हाव नव्हती. मात्र, नंतर निवडून आलेल्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता.”
एकनाथ शिंदेंच्या दोन मोठ्या घोषणा-
ज्या हिरकणीने रायगड वाचवा आणि इतिहास घडवला. ते हिरकणी गाव वाचवण्यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करत असल्याचे एकनाथ शिंदे सभागृहात म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदींनी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार लवकरच कॅबिनेट बैठकीत पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्यासाठी निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
“एकीकडे माझ्याकडे बोलण्यासाठी माणसं पाठवली आणि दुसरीकडे माझ्यावर दुषणं लावली, पदावरुन हटवण्यात आले. माझ्यावर टीका करण्यात आली. आमचे पुतळे जाळून टाकले. घरावर दगडं मारण्याची भाषा केली, पण एकनाथ शिंदेंच्या घरावर दगड मारणारा अजून कुणी पैदा झाला नाही. जितेंद्र आव्हाड यांना माहिती आहे, माझ्यावर प्रेम करणारी किती माणसं आहे, मी निघालो तर लोकांचा मधमाशांचा मोहोळ उठतो. माझ्यावर चालून आले तर ही लोक त्यांना डसून संपवून टाकतील”, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
“राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. ही काही छोटी घटना नाही. जगातील 33 देश आमच्या ध्येयाकडे लक्ष देत होते. एकीकडे मला चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण दिले जात होते आणि दुसरीकडे मला पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले जात होते. पण आज त्यांना उत्तर मिळाले. आजही मी मुख्यमंत्री म्हणून या सभागृहात बोलत आहे यावर माझा विश्वास बसत नाही,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “पदाच्या लालसेपोटी मी कधीही प्रचार सुरू केला नाही. कधीही कुटुंबाची काळजी घेतली नाही. मी माझ्या समर्थकांना सांगितले की, त्यांचे नुकसान होत असेल, तर शिवसेनेला वाचवण्यासाठी मी एकटा शहीद झालो तरी चालेल. मी लढेन आणि मरेन, पण मी मागे हटणार नाही. राज्यसभा, विधानपरिषदेच्या निवडणुकांदरम्यान माझ्याशी खालच्या दर्जाची वागणूक मिळाली. माझे बाप काढण्यात आले.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

