Share

Eknath Shinde | “आनंद दिघेंचा मृत्यू झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी विचारलं…”, एकनाथ शिंदेंचा आरोप

Published On: 

मुंबई : ५ ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा (Dussehra Melawa) पार पडला. यावर्षी पहिल्यांदा हा मेळावा दोन ठिकाणी पार पडला असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हा पहिलाच मेळावा होता. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर टीकेचा पाऊस केला. अशातच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप :

आनंद दिघे यांचा मृत्यू झाला तेव्हा उद्धव ठाकरे भेटायला आले. यावेळी दिघे साहेबांनी ठाण्यात काय केलं, पक्ष कसा वाढला, संघटना कशी वाढली, कसे काम करत होते आता ठाणे जिल्ह्यात आपण काय करावं लागले अशी विचारपूस उद्धव ठाकरे करतील अशी अपेक्षा होती, मात्र, त्यांनी सर्वा आदी आनंद दिघेंची संपत्ती किती आणि कुठे आहे असं विचारलं, असा आरोप एकनाथ शिंदेंनी केला आहे. तसेच त्यांचा हा प्रश्न मला धक्काच बसला असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

आनंद दिघे (Anand Dighe) साहेबांचं बँकेत खातंही नसल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली. मी कधीही खोटं बोलत नाही, खोटं बोलून सहानुभुती मिळवणारा एकनाथ शिंदे नाही, असं देखील ते म्हणाले.

बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही जे पाप केलं, ते शिवसैनिक कधीही विसरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनताही तुम्हाला माफ करणार नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते असंही म्हणाले, तुम्ही वैचारिक व्यभिचार केला आहे. तुम्ही जे पाप केल आहे, त्यासाठी आधी बाळासाहेबांच्या शिवतीर्थावरील समाधीवर गुडघे टेका आणि माफी मागा, मग आमच्यावर बोला.

तसेच, आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झालीय. अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं का?,असा खोचक सवालही शिंदे यांनी ठाकरेंना केला. सहन करण्याची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण? जनतेला समजलं आहे. म्हणून जनता आमच्याबरोबर आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!