Share

Eknath Shinde | “आम्ही गद्दारी केली नाही, तर…”; एकनाथ शिंदेंचं शिवसेनेला प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा पार पडला. संपुर्ण राज्याचं लक्ष वेधलेल्या हा मेळावा दोन्ही ठिकाणी झाला. एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर तर उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर. यावेळी दोन्ही गटाने एकमेकांवर टीपा-टिप्पणी केल्या आहेत. आपल्याला माहित असेल की, ठाकरे गटाकडून शिंदे गटाला सतत ‘गद्दार’ असं बोललं जात होतं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मेळाव्यात बोलताना याचं प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

आम्ही गद्दारी केली नाही, तर गदर केलाय. गदर म्हणजे क्रांती. आम्ही गद्दार नाही, तर बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. ते आम्ही अभिमानाने छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच वार केला आहे.

बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही जे पाप केलं, ते शिवसैनिक कधीही विसरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनताही तुम्हाला माफ करणार नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते असंही म्हणाले, तुम्ही वैचारिक व्यभिचार केला आहे. तुम्ही जे पाप केल आहे, त्यासाठी आधी बाळासाहेबांच्या शिवतीर्थावरील समाधीवर गुडघे टेका आणि माफी मागा, मग आमच्यावर बोला.

तसेच, आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झालीय. अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं का?,असा खोचक सवालही शिंदे यांनी ठाकरेंना केला. सहन करण्याची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण? जनतेला समजलं आहे. म्हणून जनता आमच्याबरोबर आहे.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!