मुंबई : बंड करत शिवसेनामध्ये फुट पाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज पहिला मेळावा आहे. तर शिवसेना पक्षाचा परंपरा असलेला दसरा मेळावा उद्धव ठाकरे शिवतीर्थावर घेत आहेत. दोन्ही मैदानांवर एकाच वेळी दसरा मेळावे पार पडत आहेत. यावेळी शिंदेंना गद्दार म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात भाषण देताना शिंदेंनी गद्दारीचं स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी गद्दारी झाली, झालीच गद्दारी, २०१९ सालीच गद्दारी झाली, जेव्हा महाविकास आघाडी घडली तेव्हाच गद्दारी झाली, असा जोरदार हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी यावेळी केला आहे.
आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्मपरिक्षण करा, असा इशारा देखील शिंदेंनी दिला आहे. आम्ही नाही तर तुम्ही गद्दार आहात, असा घणाघात देखील त्यांनी केला आहे. तसेच मविआ सोबत गेला तेव्हा तुम्ही राजीनामे दिले होते का, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे.
बीकेसीवर होत असलेल्या मेळाव्यात भषणापुर्वी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरें प्रमाणेच नतमस्तक झाले. राज्याच्या काना कोपऱ्यातून अनेक लोक येथे आले आहेत, काही लोक कालपासूनच आले आहेत, तर काही पाहटेच बीकेसीवर दाखल झाले, त्यामुळे मला तुमच्या भावा समोर नतमस्तक व्हावं लागलं असं एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे देखील मंचावर पोहचताच नतमस्तक झाले होते. यावेळी डाॅक्टरांनी परवानगी दिली नसली तरी मी झुकलो आणि झुकल्या शिवाय पुढे जाणारही नाही असं उद्धव ठाकरेंनी ठणकून सांगितलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “… म्हणून मला भाषणापुर्वी नतमस्तक व्हावं लागलं”, उद्धव ठाकरें प्रमाणे नतमस्तक झालेल्या एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
- Uddhav Thackeray | “बाप चोरणारी औलाद यांची…”; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल
- Dasara Melava | उद्धव ठाकरे कडाडले! केंद्रापासून राज्यातील नेत्यांवर घणाघात, भाषणातील प्रमुख मुद्दे वाचा…
- Shivsena । “…म्हणून मी महाविकास आघाडी केली होती”; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
- Rahul Shewale | “एनटी रामाराव यांच्याविरोधात जावयाने बंड केला, तेव्हा…”, राहुल शेवाळेंचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

