🕒 1 min read
मुंबई : शिवसेना पक्षाची परंपरा असलेला दसरा मेळावा आज दोन ठिकाणी पार पडत आहे. आजचा मेळावा ५६वा दसरा मेळावा असून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी याचं आयोजन केलं आहे. या दोन्ही मेळाव्यांमध्ये नेत्यांच्या वक्तव्यांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बंड केलेल्या आमदारांनी बाप चोरला असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. यावर राहुल शेवाळे यांनी पलटवार केला आहे.
बाप चोरला, असा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंना उत्तर देताना राहु शेवाळेंनी एनटी रामाराव यांचं उदाहरण दिलं आहे. यावेळी रामराव यांच्याविरोधात जावयाने बंड केला, तेव्हा एनटी रामारावांनी माझा बाप जावयाने चोरला असा आरोप केला नाही, असं शेवाळे म्हणाले. तसेच अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव यांच्या पक्षातही वाद झाला. मात्र, अखिलेशच्या काकाने अखिलेशचा बाप चोरला असा आरोप झाला नाही. जीवंत उदाहरण म्हणजे चिराग पासवान. चिराग पासवान यांच्या पक्षातही फुट पडली. मात्र, त्यांनीही कधी माझा बाप माझ्या काकांनी चोरला असा आरोप केला नाही, मात्र हिंदुस्तानाच्या राजकारणातील ही एकमेव व्यक्ती जिने बाप चोरीला गेला असं म्हणतो. हिंदुस्तानच्या इतिहासाच या सर्व गोष्टींचा उल्लेख होईल, असं देखील ते म्हणाले.
शिवसेना प्रमुखांना चोरले असा आरोप अत्यंत दुर्दैवी असून हिंदुस्तानच्या राजकारणात कधीच कोणत्या नेत्याने या गोष्टीचा उल्लेख केला नसल्याचं शेवाळेंनी सांगितलं आहे. तसेच याचं जीवंत उदाहरण म्हणजे १९७० मध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी इंदिरा गांधींविरोधात वेगळा पक्ष काढण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळी इंदिरा गांधींनी कधीच म्हटलं नाही की माझा बाप जवाहरलाल नेहरू यांना चोरलं असं देखील शेवाळे म्हणाले.
मला स्वप्नातही वाटलं नाही की, मी राहुल रमेश शेवाळे याला या व्यासपीठावर भाषण करण्याची संधी मिळेल. मी राहुल रमेश शेवाळे या नावाचा वापर वारंवार करत आहे, कारण मी कुणाचा बाप चोरलेला नाही. माझं नाव राहुल रमेश शेवाळे आहे. माझे वडील रमेश संभाजी शेवाळे हे होते, हे तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो. कारण वारंवार आमच्यावर आरोप होतो की माझा बाप चोरला, असं शेवाळे म्हणाले.
दरम्यान, शेवाळे यांनी महाभारताचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांचं समर्थन केलं आहे. यावेळी त्यांची भगवदगीतेचा देखील उल्लेख केला आहे.
बीकेसी मैदानावर साजरा होत असलेल्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची खुर्ची ठेवण्यात आली आहे. त्याबरोबरच बाजूला चरणसिंग थापा उभे राहणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. चरणसिंग थापा हे स्व.बाळासाहेब ठाकरे यांची सावली समजले जातात. काही दिवसांपूर्वीच चरण सिंग थापा यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare । नारायणराव, सोनिया गांधींच्या पायावर १० वर्ष लोटांगण घातली, अन् तुम्ही हिंदुत्वावर बोलावं?; सुषमा अंधारेंचा आक्रमक सवाल
- Ambadas Danve | “ठाकरेंच्या बळावर तुम्हाला नेस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नाही “; दानवेंचा शिंदे गटाला इशारा
- Rahul Shevale | “उद्धव ठाकरे रुग्णालयात होते, तेव्हा…” ; राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात
- Ambadas Danve । मुख्यमंत्र्यांच्या आमदारांच्या अंगात सत्तेची मस्ती चढली आहे; दानवे आक्रमक
- Dasara Melava | “हिंदुह्रदयसम्राट मैद्याचं पोतं कुणाला म्हणायचे?” ; शहाजी पाटलांचा शरद पवारांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
