मुंबई : मुंबई मेट्रो तीनची चाचणी आज घेण्यात आली होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टोला लगावला.
एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर टोलाः
संघर्ष नंतर शिंदे फडणवीस सरकार एकत्र आलं आहे. आता विकास थांबणार नाही. मेट्रो तीनचा पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी फायदाच होणार आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला. मेट्रो तीनचा हा प्रकल्प साडे 30 किलोमीटरचा आहे. या भागात कनेक्टिव्हिटी नव्हती. 17 लाख प्रवासी यामधून ये जा करणार आहेत. साडे सहा लाख गाड्या आता रस्त्यावर धावणार नाहीत, लाखो लिटर इंधनाची बचत होणार आहे, पर्यावरण तसाच वेळ देखील वाचणार आहे, लोकलचा प्रवास करताना अतिशय त्रास होतो. मात्र हा 33 किलोमीटरचा प्रवास आरामदायी होणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. मात्र पाच वर्षांच्या काळात प्रकल्पाने चांगली प्रगती केली असून मी देखील त्याच मंत्रिमंडळात सहभागी होतो. अनेकांनी त्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आता गणपती बाप्पाचा आगमन होणार आहे. त्यामुळे अडथळे दूर होतील, असा टोला एकनाथ शिंदेंनी यावेळी लगावला. वायू प्रदूषण दूर होईल, रस्त्यावरची वाहने कमी होतील, या निमित्ताने राजकीय प्रदूषण ही बंद झालं आहे.
दरम्यान, पर्यावरणाचा समतोल राखणं आपलं काम आहे, असं शिंदे म्हणाले आहेत. प्रकल्पाच्या तिन्ही बाजूने झाडं असल्यामुळे लोकांच्या मताचा विचार करून न्यायालयाने देखील हिरवा झेंडा दाखवला असून सर्वांचं सहकार्य अपेक्षित असल्याचं एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Sharad Pawar | “माझं बोट धरुन राजकारण शिकलेली व्यक्ती देशासाठी..”, शरद पवारांचा नरेंद्र मोंदींवर हल्लाबोल
- Thackeray vs Shinde | “अपात्रतेचे प्रकरण सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत चालणार” ; शिंदे गटातील मंत्र्यांचे विधान
- Atul Bhatkhalkar | सोनिया गांधींच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळे अतुल भातखळकरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
- Education | आता पुस्तकांनाच जोडणार वह्यांची पाने, शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय
- Uddhav Thackrey | “परवानगी मिळो अथवा न मिळो, दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार”, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा


