Share

Sharad Pawar | “माझं बोट धरुन राजकारण शिकलेली व्यक्ती देशासाठी..”, शरद पवारांचा नरेंद्र मोंदींवर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सोमवारी ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली होती. ही बैठक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका केली आहे.

माझं बोट धरून राजकारण शिकलेला व्यक्ती देशासाठी इतका घातक ठरेलः

नरेंद्र मोदींनी शरद पवारांचं बोट धरुन राजकारणात प्रगती केल्याचा प्रश्न पत्रकारांकडून रपण्यात आला. यावर पवार यांनी बारामतीत उत्तर देत नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझं बोट धरून राजकारण शिकलेला व्यक्ती देशासाठी इतका घातक ठरेल असं मला वाटलं नव्हत, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांचा भाजपवर निशाणाः

पुण्यानंतर राज्याच्या राजकारणात ठाणे हा महत्त्वाचा जिल्हा आहे असं म्हणत आपल्या राज्याच्या दौऱ्याची सुरुवात ठाण्यापासून करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे. आपल्या वयाचा दाखला देत देशाच्या सत्तेची जबाबदारी आपण स्वीकारणार नसून तशी इच्छाही नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

गुजरात दंगलीमधील सामूहिक बलात्काराच्या दोषींना गुजरात सरकारने मुक्त केल्याबद्दल पवारांनी आश्चर्य व्यक्त केलंय. यावर एकीकडे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून महिलांच्या आदर बाबत चर्चा करतात दुसरीकडे बलात्कारा केलेल्या दोषींना निर्दोष सुटका करतात. त्यामुळे भाजपचा खरा चेहरा लोकांसमोर आला असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील शरद पवार आणि टीकास्त्र सोडलं आहे. पूर्वीचे ठाणे हे चांगले आणि सुसंस्कृत नेते देणारे म्हणून ओळखले जायचे. यावेळी त्यांनी प्रभाकर हेगडे, विमल रांगणेकर, आदींचा दाखला दिला आहे. त्यामुळे ठाण्यातील जनता यापुढे कायम राहील, अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!