मुंबई : महाराष्ट्र सरकाराचा न्यायालयावर देखील ताबा आहे का? हा प्रश्न आज उपस्थित होत आहे. आम्ही थेट न्यायालयावर बोट उचचले याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण याला कारणीभूत आहे शिंदे गटातील मंत्र्यांचे वक्तव्य. “घटनापीठाकडे गेलेल्या तक्रारीवर चार ते पाच वर्ष निकाल येणार नाही. यानंतर २०२४ ची निवडणूक आपण जिंकू आणि पुन्हा सत्तेत येऊ,” असं मंत्री भरत गोगावले यांनी रत्नागितिरीत एका सभेत बोलताना म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
एकीकडे खरी शिवसेना कोण, हे सांगायला न्यायालय तारीख पे तारीख देत आहे. हे प्रकरण घटना पिठाकडे वर्ग करण्यात आले. पण घटना पिठातील सदस्यांनी नियुक्ती अजून झाली नाही. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची झालेली निवृत्ती, त्यामुळे जनता देखील संभ्रमात आहे. नेमकं महाराष्ट्रात चाललय काय?
यालयाचा निर्णय मान्य करणार?-
नुकतेच शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या ‘अपात्रते’बाबत वक्तव्य केले होते. या सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत आपल्याविरुद्ध न्यायालयात अपात्रतेचा खटला सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले होते. मात्र, राज्यातील सत्तेचा भागीदार असलेल्या भारतीय जनता पक्ष त्यांच्या वक्तव्यापासून स्वताला दुर ठेवले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करणार असल्याचे भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली भूमिका –
यावर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपली भूमिका मांडली आहे. “न्यायालयाच्या विलंबाबाबत किती मोठा आत्मविश्वास भरत गोगावले आणि इतर आमदारांना आहे हे यातून स्पष्ट होत आहे. न्यायालयांनाही गृहित धरुन राजकारण करण्यास काही लोकांनी सुरुवात केली आहे. आता न्यायालयानेच जनतेचा विश्वास टिकवायचा की नाही हे ठरवायचं आहे,” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत.
दिपक केसरक गोगावलेंच्या वक्तव्यावर म्हणाले-
शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी गोगावलेंच्या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. “सुप्रीम कोर्ट किंवा कोणत्याही कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना आमच्या पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने, आमदाराने त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही असं ठरलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तशा सूचना दिलेल्या असतानाही अनावधनाने त्यांनी वक्तव्य केलं आहे. ही आमची भूमिका नाही. यापुढे असं वक्तव्य केलं जाणार नाही याची काळजी आम्ही घेऊ”.
मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच निकाल लावण्याचे काम भरत गोगावले यांनी केले. त्यामुळे महाराष्ट्र सरकाराचा न्यायालयावर देखील ताबा आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे खऱ्या शिवसेनेबाबत निकाल लागणार की गोगावले म्हणतात तसे सरकारच्या सोयीनुसार निकाल लागणार, हे पाहणे महत्वाचे ठरले.
महत्वाच्या बातम्या :
- Atul Bhatkhalkar | सोनिया गांधींच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळे अतुल भातखळकरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
- Education | आता पुस्तकांनाच जोडणार वह्यांची पाने, शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय
- Uddhav Thackrey | “परवानगी मिळो अथवा न मिळो, दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार”, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
- Amit Shah। अमित शहांच्या रडारवर आता बिहार; स्वत: हातात घेतली सुत्रे
- BJP । “ज्यांना 100 आमदार निवडून आणता आले नाहीत, त्यांनी…”; बावनकुळेंचा पवारांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

