🕒 1 min read
मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पंकजा मुंडे यांना आधी विधान परिषद आणि आता मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने त्या नाराज असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. यातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केलं आहे.
एकनाथ खडसे यांचे मोठे वक्तव्य-
राष्ट्रवादीत यायचं की नाही? हा निर्णय पंकजा मुंडे यांनी घ्यायचा आहे. पण त्यांनी वर्षानुवर्षे भाजपाचं काम केलं आहे. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार करतील, असं मला वाटतं नसल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे.
तसेच, पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी काम केलं आहे. असं असताना पंकजा मुंडे यांच्यावर भाजपामध्ये अन्याय होत आहे, अशी भावना सातत्याने जनतेमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. त्यामुळे पंकजा मुंडे अस्वस्थ असल्याच्या बातम्याही येत आहेत. या सगळ्यामुळेच स्वाभाविकपणे अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन केलं, असंही खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.
अमोल मिटकरी यांच्या ऑफरवर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया-
दरम्यान, अमोल मिटकरी यांच्या या ऑफरवर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमोल मिटकरी यांनी जर एखादा चांगला विचार मांडला असेल तर पक्ष जरूर त्या संदर्भाने विचार करेल. पुढे त्या असंही म्हणाल्या की, पंकजा मुंडे ही महाराष्ट्रातील एक कर्तृत्ववान महिला आहे. त्या कोणत्याही पक्षात राहिल्या तरी माझ्या नेहमीच त्यांना शुभेच्छा आणि प्रेम आयुष्यभर असेल.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । तुमच्यात दसरा मेळावा घेण्याची हिंमत आहे का?; शिवसेनेचे शहाजीबापू पाटील आणि शिंदे गटाला आव्हान
- Mahesh Tapase | गैर भाजपशासीत राज्यातील सरकार पाडण्यामध्ये मोदी सरकारला रस – महेश तपासे
- Jayant Patil । “भाजपाला हिंदूत्वाशी घेणे-देणे नाही, तर…”; जयंत पाटलांनी सांगितले शिवसेना फोडण्यामागचे सर्वात मोठे कारण
- Devendra Fadnavis । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा
- Eknath Shinde । विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया; एकनाथ शिंदेंकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
