Share

एकनाथ खडसे अपंग?; खोट्या अपंगात्वाच्या दाखल्यावरुन दिव्यांग संघटनेचा मोर्चा

Published On: 

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठया दिव्य परिस्थितीतून जावं लागतं, मात्र खडसेंना 60 टक्के अपंगत्वाचं प्रमाणपत्र कसे मिळाले याची चौकशी करावी यासाठी काही अपंग संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढून चौकशीची मागणी केली आहे.

खडसे यांनी बनावट अपंगत्व प्रमाणपत्र मिळवले असून, हा आमच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला दिव्यांगांनी केला आहे. याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

अपंग बांधव अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे खेटे घालत असताना आम्हाला प्रमाणपत्र मिळत नाही, त्याउलट एकनाथ खडसेंनी अर्ज करताच त्यांना 60 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे मिळाले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

कोणत्या आधारावर खडसेंना 60 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेचे माजी जळगाव महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनीही एकनाथ खडसे यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राच्या चौकशीची मागणी केली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे माहिती अधिकारात खडसेंच्या अपंगत्व प्रमाणपत्राबाबत सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे.

त्यात खडसेंची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्‍टर्सचीही माहिती मागवली आहे. सोबतच खडसेंची ज्या दिवशी वैद्यकीय तपासणी झाली, त्या दिवसाचे रुग्णालयातील आवाराचे सीसीटीव्ही फुटेजही त्यांनी मागितले आहे. चौकशीचा ससेमिरा मागे लागला की, राजकीय नेते जसे अचानक आजारी पडतात, तसाच काहीसा प्रकार खडसे यांनी करुन राज्यातील दिव्यांगांचा अपमान केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया समाज माध्यमांतून व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!