Share

जिल्ह्यात सोमवारी आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तब्बल 553 जण बाधित

Published On: 

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा कहर खुपच मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. सोमवारी 553 कोरोनाबाधीत आढळले असून आठ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला. तर 373 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून कळवले आहे.
रुग्णालयातील कक्षात तीन हजार 177 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 451 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 16 हजार 826 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 13 हजार 198 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 82 हजार 786 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले.
त्यात 1 लाख 65 हजार 374 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 16 हजार 678 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, 594 अनिर्णायक व 140 नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!