मुंबई : राज्य सरकारने पालकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. चालू शैक्षणिक वर्षात शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नाही, याबाबत शिक्षण विभागाने अध्यादेश काढला आहे. शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेऊन विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा दिला आहे.
घाबरू नका ! कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तर बरे होण्याचे प्रमाणही 30 टक्क्यांवर
फी वाढीबाबत पालकांनी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेतचं सरकारने फी वाढी संदर्भात निर्णय घेतला आहे. शाळांनी वार्षिक फी भरण्यासाठी विद्यार्थी पालकांना सक्ती करू नये. त्याऐवजी मासिक किंवा त्रैमासिक फी भरण्याचा पर्याय पालकांना देण्यात यावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. अशी परिस्थिती सुरु असताना शैक्षणिक संस्था, शाळांनी विद्यार्थी आणि पालकांना फीस भरण्याची सक्ती करता येणार नाही. काही शाळा फी भरण्यास पालकांना सक्ती करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सर्व व्यवस्थापनच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू शैक्षणिक वर्षाची आणि आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करु नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
‘वाघांनो असं रडताय काय मी आहे ना तुमच्यासाठी’, भाजपने डावलेल्या पंकजा मुंडेंनी फोडली डरकाळी
दरम्यान कोरोनाबाधितांचा महाराष्ट्रातला आकडा सर्वात वेगाने वाढतो आहे. त्यातही सर्वाधिक कोरोनाग्रस्त महानगरी मुंबईत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचा दावा आहे की, राज्यात कोरोना चाचण्यांचं प्रमाण सर्वात जास्त असल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडादेखील वाढतो आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

