नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाचं दुसरीकडे रिकव्हरी रेट देखील वाढला आहे. कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 30 टक्क्यांवर गेले आहे. तर आनंदाची बातमी म्हणजे देशातील 216 जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही.
कोरोना योद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरसावल्या सामाजिक संघटना
संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की, देशातील प्रत्येक नागरिकाला लॉकडाऊनच्या नियमाचं काटेकोरपणे आणि प्रामाणिकपणे पालन करावे लागणार आहे. त्यानंतरच देशात घुसलेल्या कोरोनाला हद्दपार करता येईल. तर आता कोरोना सोबत जगायला शिकलं पाहिजे असेही अग्रवाल म्हणाले.
‘वाघांनो असं रडताय काय मी आहे ना तुमच्यासाठी’, भाजपने डावलेल्या पंकजा मुंडेंनी फोडली डरकाळी
देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ असली तरी प्रत्येक तीन रुग्णांमध्ये एक रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी जात आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर 29.91 टक्के आहे तर मृतांचा दर 3.2 टक्के आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात मृतांचा दर सुदैवाने खूप कमी आहे. मात्र, तरी देखील काळजी घेणे महत्त्वाचं असल्याचं लव अग्रवाल यांनी सांगितलं.
गुजरात राज्य सरकारची त्यांच्याच मजुरांना राज्यात घेण्यास नकार घंटा, थोरातांचा गंभीर आरोप
दरम्यान देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3320 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59,662 झाली असून लवकरच ती 60 हजारांचा टप्पा पार करणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 95 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांचा आकडा 1981 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 17,847 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

