मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने आमदारकीच्या शर्यतीत असलेल्या अति उत्सुक नेत्यांना धक्का देत, निष्ठावंतांना पुन्हा एकदा डावलल्याचं चित्र आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या नेत्यांच्या नावावर फुली मारल्याचं चित्र आहे.
आता या दिग्गजांना डावलल्याने त्यांचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यात पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी तर भाजपवर पुन्हा तोंडसुख घ्यायला सुरवात केली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुक निमित्ताने पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्याची संधी भाजपने सोडलेली नाही. त्यामुळे पुढे भाजपाची रणनिती नेमकी काय असणार हे सर्वांना कळून चुकले आहे. पण हीच बाब आता पंकजा मुंडे यांना समजण्याची गरज असून त्यांनी मुंबईत बसून नव्हे तर बीडमध्ये राहून आपली पाळंमुळं आगोदर घट्ट करायली हवीत. अन्यथा मुंडे-खडसे यांचं काय करायचं हे भाजपाने ठरवून टाकलेलं आहे. त्यांना त्या स्वतःच पोषक वातावरण तयार करीत आहेत असे चित्र आता तयार झाले आहे, पण हे त्यांना सांगणार कोण अन् बोलणार कोण? अशी भावना आता कार्यकर्त्यांची होत आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना स्वगृही जाता येणार !
यावर पंकजा मुंडे यांनी स्वतः कार्यकर्त्यांना उद्देशून एक ट्विट करत, आपल्याला भाजपच्या या निर्णयाचा धक्का बसला नसल्याचे सांगितले आहे. ‘आईंना,ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना, ‘तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपच्या त्या चारही उमेदवारांना आशिर्वाद !’ अस म्हणत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपली सुप्त नाराजी जाहीर केली आहे.
आईंना,ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) May 8, 2020
दरम्यान, दुसरीकडे विधानपरिषदेवर जाण्यास उत्सुक असतानाही उमेदवारी डावलल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे खवळले आहेत. ‘मोदी गो बॅक’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्याला विधानपरिषदेची उमेदवारी दिली जाते, असा शब्दात एकनाथ खडसेंनी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
गुजरात राज्य सरकारची त्यांच्याच मजुरांना राज्यात घेण्यास नकार घंटा, थोरातांचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

