Share

‘सुरक्षित वातावरणात शिक्षण देणं ही प्रशासन, शाळा व्यवस्थापन, लोकप्रतिनिधी अशा सर्वांची सामुहिक जबाबदारी’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – राज्यातील ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वी च्या शाळा येत्या चार ऑक्टोबरपासून सुरु होत असून त्यादिवशी शिक्षणाचा उत्सव साजरा करून विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करावं आणि कोरोनाचे नियम पाळून सुरक्षित वातावरणात शिक्षणाची सुरुवात करण्याचं प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

“शाळा सुरक्षितपणे सुरु करण्याबाबतच्या मार्गदर्शन सत्रात“ त्या काल बोलत होत्या. सुरक्षित वातावरण देत शिक्षण देणं ही स्थानिक प्रशासन, शाळा व्यवस्थापन, लोकप्रतिनिधी अशा सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचंही गायकवाड यांनी यावेळी सांगितलं. मुलांना दडपण वाटणार नाही या उद्देशानं अभ्यासक्रम पूर्तता हे उद्दिष्ट न ठेवता विद्यार्थ्यांना मोकळं होण्याची संधी द्या असं मत या चर्चासत्रात इतर तज्ञांकडून मांडण्यात आलं.

विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत जायला प्रेरित करण्यासाठी शिक्षण विभागाने एक गाणंदेखील तयार केलं आहे. शाळा आणि अभ्यासाशी पुन्हा गट्टी, कोविडचे नियम याबाबतचा संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे. दरम्यान, राज्य कोविड कृती दलाचे सदस्य समीर दलवाई, शिक्षण हक्क मंचाच्या हेमांगी जोशी, पोपटराव पवार, माजी शिक्षण संचालक वसंत काळपांडे या चर्चासत्रात सहभागी झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!