Share

आई-वडिलांच्या वादात शिक्षण विभाग गोत्यात! दाखला देण्यावरून प्रशासन संभ्रमात

Published On: 

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील एका इंग्रजी शाळेने मुलाच्या शाळा सोडण्याचा दाखला देण्यास नकार दिल्याने एक आई आपल्या मुलासह शाळेविरोधात शनिवारी सकाळी गटशिक्षण अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसली. मात्र दुसऱ्या दिवशी रविवारीही हे उपोषण सुरूच होते. शिक्षण विभागाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, पण आई- वडील आपापल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे यावर तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागासमोर भलताच पेच निर्माण झाला आहे.

अफसाना हिरोज तडवी ही महिला मुलाचा दाखला मिळावा म्हणून शनिवारपासून शाळेविरोधात पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसली आहे. मुलाचा दाखला देण्यास वडिलांनी नकार दिला आहे. यामुळे आई-वडिलांच्या वादाचा शिक्षण विभागाला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुलाच्या दाखल्यासाठी महिलेचे दोन दिवसांपासून उपोषण सुरू आहे.

सलग दोन दिवस शिक्षण न विभा यात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाचे आई-वडील आपापल्या अट्टाहासावर ठाम असल्याने शिक्षण विभागाने आता हात टेकले आहेत. मुलाच्या आई वडिलांमध्ये गृहकलह असल्याने ते सध्या वेगवेगळे राहतात. मुलाला माहेरच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आईने शाळेत दाखला मिळावा म्हणून अर्ज केला होता. वडिलांनी नकार दिल्याने शाळेच्या मुख्याध्यापिकेने दाखला देण्यास नकार दिला. यामुळे दाखला मिळावा म्हणून महिलेचे दोन दिवसांपासून उपोषण सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!