माणगाव : राष्ट्रीय विक्रमवीर, आशियातील सर्वोत्कृष्ट भारतीय धावपटू ललिता बाबर यांची माणगावच्या प्रभारी तहसिलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ललिता बाबर म्हणाल्या, खेळाच्या मैदानावर देशाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची संधी मला मिळत आहे. या संधीचे सोने करण्याचा व जनतेची सेवा करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल.
सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील मोही इथल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ललिता बाबर यांना शालेय जीवनापासूनच मैदानी खेळांची आवड होती. त्यांनी तालुका, जिल्हा स्तरावर सातत्यपूर्ण यश मिळविलं होतं. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 2015 मध्ये क्रीडा मंत्रालयाचा वार्षिक सर्वोत्तम क्रीडापटू पुरस्कार त्यांना मिळाला होता.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीने (फिक्कीने) आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने २०१५ ला बाबर यांना स्पोर्ट्स पर्सन ऑफ दी ईयर पुरस्काराने सन्मानित केले.त्यांना अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे. शासनाने त्यांना यापूर्वीच सेवेत घेतलं आहे .
महत्वाच्या बातम्या
- ‘आता भाजपने डोनाल्ड ट्रम्प यांना जरी प्रचाराला आणलं तरीही ते ही निवडणूक जिंकू शकणार नाहीत’
- ‘पवारांना पहिल्यांदाच मी इतकं संतापलेलं पाहिलं, ते त्र्यागानं बैठकीतून निघाले…’
- केंद्र सरकार अखेर नरमलं,अमित शाह यांनी केले ‘हे’ आवाहन
- महात्मा फुलेंनी सुरू केलं होतं ते मिशन आगामी काळात आपण पूर्ण करू : चंद्रकांत पाटील
- बिबट्यास शोधून जेरबंद करण्यासाठी तब्बल सतरा पथके स्थापन


