Share

अनिल देशमुखांविरोधात ‘ईडी’ची लूक आऊट नोटीस?, राऊत म्हणाले, ‘जस्ट वेट अँड वॉच!’

Published On: 

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने लूक आऊट नोटीस बजावली आहे. असा दावा विधिज्ञ जयश्री पाटील यांनी केला आहे. त्यानुसार त्यांना लवकरच अटक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना आता देश सोडून जाता येणार नाही. त्यामुळे त्यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.

दरम्यान, या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. देशमुख यांच्याविरोधात ईडीनं लूकआऊट नोटीस जारी केली आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले की, अशाप्रकारची कोणती नोटीस आली आहे का ते मला माहित नाही. पण अशा लूकआऊट नोटीस देशात अनेकांना येत असतात. तुम्ही फक्त ‘वेट अँड वॉच’ ठेवा!’. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

‘अनिल देशमुख यांचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यावर मी बोलणार नाही. ते कायदेशीर मार्गानं लढा देत आहेत आणि असा नोटिसा देशात अनेकांना येत असतात. जस्ट वेट अँड वॉच!’, असे सूचक वक्तव्य राऊत यांनी केले.

१०० कोटींच्या घोटाळयाप्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने अनेकवेळा चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. मात्र ते एकदाही उपस्थित राहिलेले नाहीत. त्यामुळे ईडीने त्यांच्याविरोधात लूक आउट नोटीस काढली असल्याचे विधिज्ञ जयश्री पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांना आता देशातून बाहेर जाणे कठीण असणार आहे.

दरम्यान, ईडीने अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावूनही ते चौकशीला हजार राहिले नाहीत. त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांना त्यांनी निवेदन घेऊन पाठवलं होतं. त्यामुळे अखेर देशमुख आहेत कुठे? असा सवाल निर्माण झाला आहे. यावरच भाजपच्या अनेक नेत्यांनी आक्षेप घेत ठाकरे सरकार देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. त्यातच आता ईडीने अनिल देशमुख यांच्याविरोधात आता लूक आउट नोटीस काढली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत अजूनच वाढ झाली आहे. याबाबत विधिज्ञ जयश्री पाटील यांनी दावा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!