Share

अनिल देशमुखांना ईडीकडून चौथ्यांदा समन्स

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना इडीने चौथ्यांदा समन्स बजावला आहे. १०० कोटींची वसुली प्रकरणात अनिल देशमुख सध्या ईडीच्या रडारवर आहेत. सचिन वाझेन आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. त्यादिवशीपासून इडीने देशमुखांविरोधात तपास करण्यास सुरूवात केली. अनिल देशमुखांना तीन वेळा समन्स बजवाल्यानंतर ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते. त्यामुळे त्यांना चौथ्यांदा समन्स बजावून २ जुलैरोजी हजर राहण्यास सांगितले  होते. याबाबतीत देशमुखांचे वकिल इंद्रपाल सिंग यांनी माहिती दिली.

त्यानंतर अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात चौकशीतून सूट मिळावी अशी याचिका केली. त्यावर ३ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र २ ऑगस्टला त्यांना पुन्हा चौकशीला बोलवण्यात आले. अशा प्रकारे सुनावणीच्या एक दिवस आधी समन्स बजावणे योग्य नसून त्याबाबत ईडीच्या हेतूबद्दल शंका निर्माण होते अशे विधान देशमुखांचे वकिल इंद्रपाल सिंग यांनी केले आहे.

दरम्यान माझी व्हिडिओ, ऑडिओद्वारे चौकशी करा, अशी मागणी पुन्हा एकदा अनिल देशमुख यांनी केली आहे. तसेच मला ECIR ची प्रत द्या किंवा कमीतकमी माझ्याकडून हव्या असलेल्या कागदपत्रांची यादी द्या, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र अनिल देशमुख यांनी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार नाहीत, असे पत्र त्यांनी वकिलांमार्फत ईडीला दिले आहे.आता ३ ऑगस्टला अंतरिम दिलासा मिळावा यासाठी केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दरम्यान ईडीकडून आता चौथ्यांदा अनिल देशमुख यांना समन्स देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!