Share

पितृपक्षात ईडीचे शुक्लकाष्ट! अडसूळांना समन्स पाठवून काही वेळातच छापेमारी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या व मंत्र्यांच्या मागे ईडीची पिडा सुरू झाली आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते ईडीच्या रडारवर असताना आता शिवसेना नेत्यांच्या मागेही ईडीचा ससेमिरा सुरू झाला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले आहेत. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, त्यानंतर काही वेळातच आनंदराव अडसूळ यांची दोन ते अडीच तास ईडीनं चौकशी केल्यानंतर त्यांच्या घराची तपासणीही केली. नोटीस बजावल्यानंतर त्यांच्या घरी ईडी पोहोचली. आज सोमवारी सकाळी अडसुळांच्या मुंबईतील घरी ईडीचे पथक दाखल झाले असून, यामध्ये महिला आणि पुरुष अधिकारी त्यांच्या घरी पोहोचलेत.

आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत ९०० कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी आज त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. सकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली.

यावेळी अडसूळ यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेनं थेट रुग्णालयात नेण्यात आलं. मुंबईतील लाईफ लाईन मेडिकेअर या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ईडीच्या पथकाने त्यांच्या घरी धाड टाकली. मात्र, यावेळी आनंदराव अडसूळ यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांच्या मुंबईतल्या घरी तातडीने एम्ब्युलन्स बोलाविण्यात आली. गोरेगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले आहे.

सिटी कोऑपरेटीव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी सुरु आहे. असं असतानाच अडसूळ पिता- पुत्रांना अटक होणार का, हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ईडीच्या हाती त्यांच्याविरोधातील सबळ पुरावे लागल्यास अडसूळ यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली जाऊ शकते अशी शक्यता आहे.

अडसूळ यांच्यावरील आरोप
५ जानेवारी रोजी बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटाळा केल्याचा आरोप केला. अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्र सादर करण्यासाठी राणा ईडीच्या कार्यालयातही गेले होते. मुंबईमध्ये सिटी को-ऑप बँकेच्या १३ ते १४ शाखा आहेत. या बँकेत ९०० खातेदार असून ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटण्यात आलेलं कर्ज कारणीभूत असल्याचा आरोप रवी राणा यांच्याकडून करण्यात आला होता. अडसूळ यांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. खातेदारांना फक्त एक हजार एवढी रक्कम मिळत असल्याचंही रवी राणा यांनी आपल्या आरोपात म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!