मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदा महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचाच भगवा फडकेल, अशी गर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आकड्यांची जुळवाजुळव कशी करायची यापासून ते युती आघाडी कोणासोबत करायची याबाबत उभयबाजू तयारी करत आहेत.
नुकतेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रविण दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीबद्दल उत्सुकता वाढवणारं विधान केलं. यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने मनसेवर गंभीर आरोप केलेत. मनसे भाजपबरोबर जाणार ही बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे मला माहित नाही. मात्र मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करू शकत नाही, असे सांगत मनसे हा सुपारीवर चालणारा पक्ष असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलाय.
मनसेला कुणाची तरी सुपारी घ्यावीच लागेल. त्यांच्या पक्षाचं अस्तित्वच त्याच्यावर आहे. आज ना उद्या कुणाची तरी सुपारी घ्यायची आहे. वेगवेगळ्या पक्षांची सुपारी घेऊन झाली. आता ज्या भाजपच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणून उघडं नागडं केलं. आता त्याच नागड्याबरोबर उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ते कदाचित पुढे दिसेल, अशी खिल्ली अनिल परब यांनी मनसेची उडवली आहे.
यावर प्रतिउत्तर देताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी परब यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. ‘आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, तुम्ही हप्ता घेणारे आहात का? अनिल परब आणि माझा प्रवास सारखाच झालेला आहे. त्यामुळे कोण काय करतं हे मला चागलं माहित आहे. जाऊन केबलवाल्यांना विचारुन घ्या, मग कळेल.’ असे म्हणत बाळा नांदगावकर यांनी परिवहन मंत्री अनिल परबांवर टीका केली आहे. प्रभातने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ज्यादिवशी हे अनैसर्गिक सरकार पडेल, त्याचदिवशी राज्याला एक सक्षम सरकार देऊ – फडणवीस
- आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राचा गुजरातपेक्षा जास्त विकास केला – देवेंद्र फडणवीस
- दुष्काळ निवारणासाठी काम करणारे अभिनेते मकरंद अनासपुरेंच्या नावाची राज्यपालांकडे शिफारस!
- ‘सामान्यांचे हाल करणारा लॉकडाऊन पुन्हा नको’, लॉकडाऊनला अजित पवारांचा विरोध
- ‘लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे’, अजित पवारांचं विठुरायाला साकडं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

