Share

नोटबंदीपेक्षा कोरोनामुळे कॅशलेस झाली अर्थव्यवस्था; ऑनलाइन खरेदीत वाढ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: जेव्हा व्यापारात आणि बनावट नोटांच्या व्यापारात काळा पैसा जमा होण्यास सुरुवात होते. तेव्हा नोटबंदी किंवा नोटाबंदीची आवश्यकता कोणत्याही देशात येते. अशा परिस्थितीत, लोक कर चोरण्यासाठी अधिक रोख व्यवहार करण्यास सुरवात करतात, ज्यात बहुतेक मोठ्या नोटांचा समावेश आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा, बनावट नोटा, महागाई आणि दहशतवादी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गतीमानतेचा वापर केला जाऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला अनपेक्षित असलेली नोटबंदी जाहीर केली. 500 आणि 1000 रुपयांच्या चलन नोटा देशाची अर्थव्यवस्था कॅशलेस होण्यासाठी करण्यात आलेल्या नाेटबंदीचा उद्देश त्यावेळी तितका फलद्रूप झाला नाही. तसेच नोटबंदी करताना नियोजनाचा अभाव होता त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला.

मात्र आता काेेराेनाकाळाने चमत्कारच घडवला आहे. काेराेना कालावधीत डिजिटल व्यवहारांत विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे. लाेकल सर्कल्स या साेशल मीडिया प्लॅटफाॅर्मने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये राेख व्यवहारांचे प्रमाण कमी हाेऊन जवळपास निम्म्यावर आले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे काेराेनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लाॅकडाऊनमुळे लाेकांना घरातच बंदिस्त हाेऊन राहणे भाग पडले. भाेजन, आैषधे व कपड्यांसारख्या दैनंदिन वस्तूंसाठी ऑनलाइन स्टाेअरचा आधार घ्यावा लागला. या सर्वेक्षणात देशातील ३०० जिल्ह्यांतील १५ हजार लाेकांची मते घेण्यात आली.

या अहवालानुसार, बहुतांश राेखीने व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले आहे. २०१९ मध्ये २७% लाेक ५० ते १०० टक्के खरेदी काेणत्याही पावतीशिवाय राेेखीने करत हाेते. पण २०२० मध्ये हेच प्रमाण घसरून १४ टक्क्यांवर आले. केवळ डिजिटल व्यवहार वाढले नाहीत तर व्यवहाराचे प्रकारही वाढल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. सर्वेक्षणात सहभागी लाेकांनी सांगितले की, घरातील नाेकरांना वेतन वा बाहेर जेवण्यासाठीच राेख रकमेचा वापर केला. घरभाडे, मालमत्ता खरेदी किंवा घराच्या दुरुस्तीसाठी राेखीने व्यवहार केल्याचे ३ टक्के जणांनी सांगितले. चक्क ७% लोकांनी रोकडमध्ये लाच दिली.

लाेकल सर्कल्सचे अध्यक्ष सचिन तापडिया म्हणाले की, ‘गेल्या काही वर्षांत देशात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये डिजिटल पेमेंटमध्ये ३,४३४.५६ काेटींची भरभक्कम वाढ झाली’. तर तज्ज्ञांनुसार, अर्थव्यवस्थेत काळा पैसा पुन्हा वाढतोय.

नाेटबंदीमुळे केवळ काही वर्षांपर्यंत त्याचा पुरवठा ठप्प झाला होता. नाेटबंदीमुळे डिजिटल व्यवहार प्रचलित झाले असली तरी ८ महिन्यांनंतर लागू झालेल्या जीएसटीमुळे हे व्यवहार अधिक लाेकप्रिय आणि सक्षम झाले. 2019 या वर्षामध्ये 27% लोक आपली 50 ते 100% खरीदी पावती घेतल्याविना रोखीत करत होते. 2020 या वर्षामध्ये त्यांचे प्रमाण 14% वर आले. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत डिजिटल पेमेंट व्यवहाराच्या प्रमाणात ५५.१% आणि मूल्य स्वरूपात १५.२% वार्षिक वाढ झाली आहे. आॅक्टाेबरमध्ये यूपीआय आधारित पेमेंटमध्ये २०७ काेटी व्यवहार हाेऊन एक नवीन उंची गाठली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!