Share

खा. संभाजीराजे भोसले यांची वेरूळ भेट, विकासकामांबाबत अधिकाऱ्यांना केल्या विशेष सूचना!

Published On: 

खुलताबाद : खासदार संभाजीराजे भोसले यांनी त्यांचे मूळ गाव असलेल्या वेरूळ येथे शनिवारी (दि.३) सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास भेट दिली. यावेळी मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकास नमन करून छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर महाराजांनी महामंडलेश्‍वर स्वामी शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली. यावेळी येथील काही समस्यांबाबत नागरिकांनी त्यांना निवेदन देत समस्या सोडवण्याची मागणी केली.

यावेळी परिसरातील मराठा आरक्षणासाठी आतुर झालेले नागरिक अबालवृद्ध तरुण तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. तसेच खासदार संभाजीराजे भोसले यांनी वेरूळच्या गडीस भेट दिल्यानंतर यांची सुधारणा करण्याचे व परिसरातील काही स्मारकाची पडझड झाली आहे. या संदर्भात उपस्थित प्रशासकीय अधिकार्‍यांना विकासाबाबत सूचना केल्या. नंतर खा. संभाजी राजे यांनी शांतिगिरी महाराजांच्या आश्रमात भेट देऊन उपस्थित नागरिकांना मराठा आरक्षणा संदर्भात जी काही लढाई सुरू केली आहे.

त्याचे नियोजन आणि आयोजन या संदर्भात चर्चा केली. यावेळी वेरूळ ग्रामपंचायततर्फे खा. संभाजीराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले. यात वेरुळ येथील स्मारकात असलेली वस्तुसंग्रहालयाची बाग दुरुस्ती, पुतळा येथील फरशी काढलेली आहे त्याची दुरुस्ती, पुतळ्यावर छत्री लावण्यासाठी नवीन छत्री बसविणे, तसेच जयंती किंवा सणवार करिता हार फुले घालण्याकरिता पुतळ्यापर्यंत पोचण्यासाठी नवीन शिडीची व्यवस्था करावी यासह आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!