Share

पुणेकरांना दिलासा : आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मार्च महिन्यापासून झपाट्याने वाढत होती. परंतु, हळूहळू ही रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. असं असलं तरी संभाव्य तिसऱ्या लाट आणि डेल्टा प्लस व्हेरियंट प्रसार हे अधिक धोकादायक असल्याने राज्य सरकारने राज्यभरात पुन्हा कडक निर्बंध लावले आहेत.

तर, पुणे शहरात मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घसरण सुरु होती. दिवसाला ७-८ हजारांच्या घरात गेलेली होती. ही रुग्णसंख्या आता शेकड्याच्या घरात आली असली तरी नव्या बाधितांची संख्या गेले काही दिवस वाढत होती. अशा वेळी पुणेकरांनी बेफिकिरी न करता अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट आधी ४.६ टक्के इतका होता आता हा रेट ५.३ हुन अधिक झाला आहे.

दरम्यान, आज नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने पुणेकरांना किंचित दिलासा मिळाला आहे. आज (दि. ०५ जुलै) रोजी पुणे शहरात तब्बल १५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७९ हजार ८८२ इतकी झाली आहे. शहरातील २४९ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६८ हजार ५८६ झाली आहे.

तर, पुणे शहरात सध्या २ हजार ६७९ ऍक्टिव्ह (सक्रिय) रुग्ण आहेत. त्यापैकी २९० रुग्ण गंभीर तर ४४८ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!