औरंगाबाद : ऑक्सिजन गळतीमुळे नाशिकमधील एका रुग्णालयात तब्बल २२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना, बुधवारी घडली. त्यातील मृतांना श्रद्धांजली वाहत खा. भागवत कराड यांनी घडकेल्या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने 22 जणांचा मृत्यू झाला.अजूनही आकडा वाढण्याची शक्यता आहे. हे ऐकून मला तीव्र दुःख झाले आहे. या प्रसंगात मृत पावलेल्या सर्व रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली यापुढे राज्यात असे निरपराध बळी जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. असे म्हणत त्यांनी शोक व्यक्त केला.
दरम्यान, नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला गळती लागली. आतापर्यंत या दुर्घटनेमुळे ऑक्सिजन अभावी २२ रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आकडा अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण गंभीर असून तब्बल २ तास ऑक्सिजन पुरवठा खंडित होता.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चीनला पूर्व लडाखमधून सैन्य मागे घ्यावेच लागेल’, भारताने सुनावले
- अमेरिकेच्या सुरक्षेसाठी मुस्लीम देशांवर प्रवासबंदी घाला, ट्रम्पचा बायडेन यांना सल्ला
- ‘केद्रांची लसीकरण मोहीम नोटबंदीप्रमाणेच, फायदा केवळ उद्योपतींनाच’, राहुल गांधींचा हल्लाबोल
- विदेशात लस विकल्याने देशात तुटवडा, ममतांचा पंतप्रधान मोदींवर आरोप
- केंद्राचे लस धोरण अत्यंत भेदभावपूर्ण, राहुल गांधींची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
