Share

‘इस्ट ऑर वेस्ट कॅप्टन धोनी इज बेस्ट’ फाफ डुप्लेसीसने केले धोनीचे कौतुक

Published On: 

मुंबई : कोरोनामुळे स्थगीत झालेल्या आयपीएल २०२१चे दुसरे सत्र येत्या १९ सप्टेंबर पासुन युएई येथे सुरु होणार आहे. पहिलाच सामना हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघात आहे. आयपीएलसाठी अनेक खेळाडू युएईत दाखल झाले आहे.

यादरम्यान वेस्ट इंडिज येथे कॅरेबीयन प्रीमियर लीग स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील सेंट लुसीया किंग्स संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू फाफ डु प्लेसीस करत आहे. यादरम्यान त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना त्याने भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटु महेंद्रसिंह धोनीचे कौतुक केले आहे. यावेळी तो म्हणाला, ‘आयपीएल स्पर्धेत सीएसकेची कामगीरी सातत्याने चांगली राहिली आहे. यामागे कर्णधार महेंद्रसिंह धोनी खुप मोठा घटक आहे. मला आलेल्या अनुभवानुसार धोनी हा सर्वात प्रभावशाली कर्णधार आहे.’ असे म्हणत डु प्लेसीसने त्याचे कौतुक केले आहे.

आयपीएल २०२० मध्ये सीएसके पहिल्यांदाच पात्रता फेरी गाठू शकला नव्हता. मात्र आयपीएल २०२१ मध्ये सीएसकेने जोरदार पुनरागमन केले आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे स्पर्धा स्थगित झाली तेव्हा चेन्नई सुपर किंग्सचा संघ गुणतालीकेत दुसऱ्या स्थानी विराजमान होता. सीएसकेने सात सामन्यापैकी ५ सामने जिंकले होते. यात फाफ डुप्लेसीसने ३२० धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!