🕒 1 min read
बुलडाणा: जिल्हा नियोजन मंडळातून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील १६२ दिव्यांगांना रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने ‘ई ट्रायसीकल’ विक्री केंद्राचे वाटप करण्यात आले, यामध्ये त्या दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी पाच हजार रुपयांपर्यंतचा पूरक साहित्याचा देखील पुरवठा करण्यात येणार आहे दिव्यांगांना ‘ई ट्रायसिकल’वर विक्री केंद्र देण्याचा राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे.
महिला व बाल विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात ४५९५ महिला बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. शासनाकडून या महिला बचत गटांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व रोजगाराला चालना मिळावी यासाठी सार्वजनिक वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत बचत गटातील दिव्यांग व्यक्तींसाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ‘ई ट्रायसिकल’चे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील १६२ दिव्यांगांना ‘ई ट्रायसिकल’ व त्यावर विक्री केंद्र देण्यात आले आहे. या दिव्यांगांना सोयीस्कर पडेल असा व्यवसाय करुन ते या माध्यमातून आपला प्रपंच चालवू शकतात व त्यांच्या रोजगाराला देखील चालना मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री शिंगणे यांनी दिली. आज प्रायोगिक तत्त्वावर पाच दिव्यांगांना ‘ई ट्रायसिकल’चे वाटप करण्यात आले असून, येत्या आठवड्यात सर्व १६२ जणांना वाटप करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शरद पवारांच्या बदनामीची सुपारी फडणवीसांनी पडळकरांना दिलीये’
- ‘जुलाई आ गया है, वैक्सीन नहीं आयीं’, राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला
- प्रवाशांना दिलासा! नंदीग्राम एक्स्प्रेससह अमृतसर, विशाखापट्टणम एक्स्प्रेस येणार रुळावर
- ‘स्मार्ट’ औरंगाबादसाठी महापालिकेला गरज १४७ कोटी रुपयांची!
- ‘फडणवीस-शाह भेटीचा सरकार पाडण्याशी संबंध नाही’, दानवेंचे स्पष्टीकरण


