🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे काही रेल्वे तात्पुरत्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यातील बहुतांश रेल्वे गाड्या पुन्हा प्रवाशांच्या सेवेत जुलै महिन्यापासून सुरु होणार आहेत. यात नांदेड-पनवेल एक्स्प्रेस, आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, रामेश्वरम एक्स्प्रेस आणि विशाखापट्टणम एक्सप्रेस जुलै महिन्याच्या पहिल्यात आठवड्यात पुन्हा सुरू होणार आहेत. यामुळे पर्यटक तसेच प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
१ जुलैपासून नांदेड ते पनवेल एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत सुरू झाली आहे. तसेच आदिलाबाद ते मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस आज (दि.२) जुलैपासून सुरू होणार आहे. यासोबतच जनशताब्दी एक्स्प्रेस, निजामुद्दीन एक्स्प्रेस, बंगलोर एक्स्प्रेस, जम्मू तावी एक्स्प्रेस, संत्रा गच्ची एक्स्प्रेस, जयपूर एक्स्प्रेस, इत्यादी महत्वाच्या रेल्वे या पूर्वीच सुरु झाल्या आहेत. नांदेड ते पनवेल विशेष गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून दि. १ जुलैपासून नियमित सुरू होत आहे.
पनवेल ते नांदेड विशेष गाडी पनवेल रेल्वे स्थानकावरून शुक्रवारी २ जुलैपासून नियमित सुरु होत आहे. तर मुंबई सी.एस.टी.एम. ते आदिलाबाद नंदिग्राम विशेष एक्स्प्रेस ही मुंबई सी.एस.टी.एम. ते आदिलाबाद नंदिग्राम विशेष एक्स्प्रेस मुंबई सी.एस.एम.टी. येथून सुरू झाली आहे. त्याचबरोबर आदिलाबाद ते मुंबई नंदिग्राम विशेष रेल्वे आदिलाबाद ते मुंबई येथून आज दि.२ पासून धावणार आहे. तर अमृतसर ते हुजूर साहिब नांदेड ही रेल्वे सोमवारी अमृतसर येथून दि. ५ जुलै रोजी दुपारी २ वाजून ३० मिनिटाने सुटेल.
तर हुजूर साहिब नांदेड ते अमृतसर ही रेल्वे बुधवारी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर ७ जुलै पासून दुपारी ११ वाजून ५ मिनिटाने सुटेल आणि हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे अमृतसर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटाने पोहोचेल. तर कोल्हापुर ते नागपुर विशेष एक्स्प्रेस २ जुलैपासून कोल्हापुर ते नागपुर अशी धावणार आहे. तर नागपुर ते कोल्हापुर विशेष एक्स्प्रेस दि. ३ जुलैपासून नागपुर ते कोल्हापुर अशी धावणार आहे. तर रामेश्वरम ते ओखा विशेष रेल्वे रामेश्वरम येथून २ जुलै पासून दि. ५ नोव्हेंबरपर्यंत नियमित सुरू करण्यात आली आहे. तर ओखा ते रामेश्वरम विशेष गाडी ६ जुलैपासून ९ नोव्हेंबर पर्यंत नियमित सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘स्मार्ट’ औरंगाबादसाठी महापालिकेला गरज १४७ कोटी रुपयांची!
- ‘फडणवीस-शाह भेटीचा सरकार पाडण्याशी संबंध नाही’, दानवेंचे स्पष्टीकरण
- मराठा आरक्षण : पुनर्विचार याचिका कोर्टाने फेटाळल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघणार
- ‘…आता उरलेल्या ४३ कारखान्यांवर देखील कारवाई करा’; राजू शेट्टींची ईडीकडे मागणी
- खुशखबर! अखेर प्रतीक्षा संपली औरंगाबादेत १५ हजार लसींचा साठा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

