Share

शनिशिंगणापूरमध्ये दार उघड उद्धवा दार उघडच्या घोषणांसह भाजपचा घंटानाद

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- दार उघड उद्धवा दार उघडच्या घोषणांसह नेवासे भाजपच्या वतीने शहरासह तालुक्यातील विविध मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्यातील सर्व मंदिरे सुरू करावीत या मागणीसाठी भाजपच्या अध्यात्मिक आघाडी व विविध धार्मिक संघटनांच्या वतीने काल शनिशिंगणापूर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

नेवासे तालुका भाजपच्या वतीने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नितीन दिनकर यांच्या नेतृत्वाखाली शनिशिंगणापूर येथे तर नेवासे भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे यांच्या नेतृत्वाखाली नेवासे शहरातील खोलेश्वर गणपती मंदिर, संत तुकाराम महाराज मंदिर, ज्ञानेश्वर मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

श्रीगोंद्यातील भूसंपादनासाठी पन्नास कोटी मंजूर- खा.सुजय विखे

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, मंदिरे बंद असणे हा राज्यातील भाविकांवर अन्याय आहे. महाराष्ट्रातले लॉकडाऊन उठले असून देखील तीर्थक्षेत्रे व मंदिरे बंद आहेत. या सरकारने मंदिरांची दारे खुली करावीत. भजन व प्रवचनाला परवानगी द्यावी म्हणून हे आंदोलन असून सरकारने याबाबत गांभीर्याने घ्यावे.

कोरोनावर मात करून आमदार लहू कानडे यांची कामकाजाला सुरुवात

मनोज पारखे म्हणाले, राज्यातील सर्वच व्यवसाय सुरू करण्याचे निर्णय सरकारने घेतले. मात्र मंदिरे उघडण्याचा निर्णय न घेतल्यामुळे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेले व्यवसाय पाच महिन्यांपासून बंद असल्यामुळे आर्थिक अडचणीत आले आहेत. या आंदोलनाला निरंजन डहाळे, नगरसेवक सुनील वाघ, प्रशांत बहिरट, महेश लबडे आदी सहभागी झाले होते.

शिवसेनेच्या ‘या’ दमदार आमदाराला कोरोनाचा विळखा ; अतिदक्षता विभागात उपचार सुरु

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!