🕒 1 min read
मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज (१५ नोव्हेंबर) पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाले. ते १०० वर्षाचे होते. त्यांच्या निधनाची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू होते. शिवशहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
याबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे साहित्य, नाट्यक्षेत्राशी संबंधित असणारे अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे साहित्य, नाट्यक्षेत्राशी संबंधित असणारे अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली.
— Supriya Sule (@supriya_sule) November 15, 2021
‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाट्याचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस झाला.
दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील.
महत्वाच्या बातम्या
- अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही- शरद पवार
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
- खैरे, तुम्ही संसदेत हवे आहात; लोकसभेसाठी खैरेच उमेदवार, संजय राऊत यांचे संकेत!
- ‘जेव्हा राज्यात शरद पवारांचं सरकार येतं, तेव्हा दंगली घडतातच’
- …अन्यथा उच्च न्यायालयात जाणार; कंगना विरोधात पुण्यात गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
