🕒 1 min read
बीड : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी ढगफुटीसदृश्य पावसामुळे संकटात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांनी शनिवारी आणि आज रविवार हिंगोली तसेच नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
परंतू आता फडणवीस आणि दरेकर यांचा बीड जिल्ह्यातील पाहणी दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आजारी आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी दौरा रद्द केल्याचे बोलले जात आहे. फडणवीस हे विरोधी पक्षनेते असण्याबरोबरच राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे अशा पाहणी दौऱ्याच्यावेळी त्या-त्या भागातील प्रस्थापित नेतेही सोबत असतात. पण देवेंद्र फडणवीस यांच्या मराठवाडा दौऱ्यावेळी पंकजा मुंडे उपस्थित राहणार नव्हत्या. आजारी असल्यामुळे आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा मराठवाडा दौरा आणि पंकजा मुंडे यांचे आजारपण यावरुन राजकीय वतुर्ळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीपासून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती. मंत्रिमंडळ विस्तारादरम्यानही या चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दौऱ्याची घोषणा आणि पंकजा मुंडे यांचे आजारी पडणं यामुळं राजकीय तर्कवितर्क लावले जात आहे.
फडणवीस उद्या उस्मानाबाद दौऱ्यावर
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी फडणवीस तसेच दरेकर सोमवारी (दि.४) जिल्ह्यात येत आहेत, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी होऊन शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली तर साेयाबीनसह उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी फडणवीस व दरेकर सोमवारी जिल्ह्यात येत आहेत.दोघेही लातूरवरून येत असून, उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर येथे दुपारी एक वाजता नुकसानग्रस्त भागाला भेट देतील. त्यानंतर दोन वाजता तेर येथे पाहणी करतील. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. कळंब तालुक्यातील आवाड शिरपुरा येथे शेतीची पाहणी करतील.
महत्त्वाच्या बातम्या
- नगरमध्ये उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाची आत्महत्या
- ‘शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळलेय, सुलतानी संकट टाळा’, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये शिवसेना संपविण्याचे काम केले’, सुभाष साबणेंचा आरोप
- ‘देशमुख व परमबीरपैकी एकाला ‘वर्षा’वर तर दुसऱ्याला ‘मातोश्री’वर लपवलेय!’, सोमय्यांचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

