Share

चक्क १२०० किमी सायकल चालवत चाहत्याने घेतली सोनू सुदची भेट

Published On: 

मुंबई : अभिनेता सोनू सूदने कोरोना कोरोना काळात अनेक कोरोनाग्रस्त आणि गरजवंत लोकांना मदत आजही अहोरात्र मदत केली आहे. आजही त्याचे समाज कार्य सुरु आहे. त्याच्या या कामाचे अनेकजण कौतुक करत आहेत. अनेक लोक त्याला देवासमान मानतात. सोनूला या कार्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. नुकतेच त्याच्या एका चाहत्याने सोनूची भेट घेण्यासाठी चक्क १२०० किलोमीटर सायकल चालवत मुंबईला पोहचला आहे.

जेव्हा ही व्यक्ती सोनू सूदच्या घराबाहेर पोहोचली तेव्हा अभिनेता सोनू सूद स्वत: त्याला भेटण्यासाठी घराबाहेर आला. या व्यक्तीने आपल्या सायकलच्या मागे सोनू सूदचा एक मोठा फोटो ठेवला होता. यासह या व्यक्तीने  सोनूसाठी फुल व हार आणले होते. जेव्हा ती व्यक्ती सोनू सूदच्या पायाजवळ फुले देऊ लागला तेव्हा सोनूने तो हार त्या व्यक्तीच्या गळ्यात घातला. यानंतर सोनूने त्यांचे स्वागत केले आणि त्यांची प्रकृती जाणून घेतली.

https://www.instagram.com/tv/CRbBK1Qnluj/?utm_source=ig_web_copy_link

 

याविषयी सोनुने पोस्ट करत लिहिले की, मुंबईत येऊन मला भेटायला ११ दिवसांत १२०० किलोमीटर चालून आलेल्या सिरसा येथील भक्तिगायक पंजाब सिंग यांच्या येण्याने मी खूप भारावून गेलो आहे. मी आशा करतो की देव त्यांना जीवनात सर्व यश देवो. त्यांच्या सर्व स्वप्ने सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा.

तर पुढे तो म्हणाला, मी माझ्या चाहत्यांना आणि अनुयायांना देखील विनंती करतो की फक्त येऊन मला भेटण्यासाठी सायकल चालवून किंवा पायी चालून कोणताही त्रास करून घेऊ नका. मी तुमच्या सर्वांसाठी नेहमी उपलब्ध आहे. कृपया शक्य तितक्या घरात राहण्याचा प्रयत्न करा. घरी रहा. सुरक्षित राहा, असे म्हणत त्याने चाहत्यांना संदेश दिला आहे.

काही दिवसापूर्वी हैद्राबादहुन थेट मुंबईकडे सोनू सूदला भेटण्यासाठी एक युवक पायी चालत आला होता. या युवकाने ७०० किमी पायी चालत हैदराबादहून मुंबईपर्यंतचे अंतर पायी चालत पार केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!