Share

शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली सीमेवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. दिल्लीच्या सिमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. हजारो वाहने रस्त्यावर उभी असल्याचे दिसून येत आहे.

केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त मोर्चाच्या वतीने संपूर्ण भारत बंदला सुरुवात झाली असून या बंदला काँग्रेस, शिवसेना पाठोपाठ सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. या बंद दरम्यान शेतकरी वेगवेगळ्या महामार्गावरील गाड्या तसेच रेल्वे लाईन अडविण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील वाहतूक पोलिसांनी गाझीपूर सीमेवर वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. तसेच शेतकऱ्यांनी पंजाब-हरियाणा शंभू सीमा देखील बंद केली आहे. स. ६ ते दु. ४ वाजेपर्यंत शेतकरी रस्ते अडवून निषेध करणार आहेत.

याबाबत राकेश टिकैत म्हणतात, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी भारत बंद होणार आहे याची माहिती आधीच देण्यात आली होती. या भारत बंदच्या काळात सकाळी ६ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या वेळेत वाहतूक कोंडी होऊ शकते याबाबत आम्ही आधीच सतर्क केले होते. ज्यांनी या माहितीकडे दुर्लक्ष केले त्यांना या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

नागरिकांनी दुपारच्या जेवणानंतरच घराबाहेर पडावे असे आम्ही नागरिकांना अवाहन केले होते. मात्र याकडे कुणीही लक्ष दिले नाही. जोपर्यंत नवे कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरुच ठेऊ, यासाठी दहा वर्ष लागली तरी चालतील, असे राकेश टिकैत म्हणाले.

मराठी बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!