Share

दारूच्या नशेत थेट बापावरच झाडल्या गोळ्या!

Published On: 

बीड: दारूच्या नशेत कोण काय करेल काही सांगता येत नाही. दारूच्या नशेत माणूस कुठल्या थरात जाईल काही नेम नाही. जिल्ह्यातील आष्टी येथे अशीच एक घटना घडली आहे. दारूच्या नशेत मुलाने थेट आपल्या बापावरच गोळ्या झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन गोळ्या झाडल्या त्यातली एक लागून बाप जखमी झाला, त्यानंतर पोलिसांनी मुलाला अटक केली असून न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

घरगुती वाद सुरू असताना वडिलांनी आईवर रिव्हॉल्व्हर रोखून तिला मारून टाकतो अशी धमकी वडील देत होते आणि तिथेच त्यांचा मुलगा दारूच्या नशेत होता. आईला वाचवण्यासाठी आणि दारूच्या नशेत त्याने थेट दोन गोळ्या वडिलांवर झाडल्या. पोलिसांनी अटक केलेल्या किरण लटपटे (२४) या मुलास शुक्रवारी आष्टी येथील न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदडांधिकारी के. के. माने यांनी त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आष्टी शहरातील लिमटाका गणपती मंदिराजवळ राहणारे माजी सैनिक संतोष लटपटे हे पत्नीला सतत मारहाण करत. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत त्यांनी आपल्या पत्नीवर रिव्हॉल्व्हर रोखत तुला मारूनच टाकतो अशी धमकी देत प्रत्यक्ष मारण्याच्या तयारीत असताना मुलगा किरण लटपटे याने वडिलांना धक्का दिला. त्यामुळे संतोष लटपटेंच्या हातातील रिव्हॉल्व्हर खाली पडली. त्यानंतर मुलगा किरणने रिव्हॉल्व्हर उचलून बापावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील एक गोळी संतोष लटपटे यांच्या पोटात घुसल्याने रक्तस्राव झाला होता. दरम्यान, जखमी माजी सैनिक संतोष किसन लटपटे यांना अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आता त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत असल्याचे कळते. पोलिसांनी या घटनेतील मुलाकडील रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे. न्यायालयाने किरणला २४ मेपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!