अहमदनगर : समस्त बहुजन समाजाला आपल्या इतिहासाची आठवण करून देण्यासाठी गोपीचंद पडळकर हे वाफगाव ते चौंडी २९ मे ते ३१ मे इतिहास जागर यात्रा करणार आहेत. चला करूया जागर अहिल्यादेवी युगाचा, जागर पराक्रमी इतिहासाचा, जय मल्हार…जय अहिल्या… अशी घोषणा गोपीचंद पडळकर यांनी काल केली होती. तसेच त्यांनी अहिल्या मातेच्या जन्मस्थळी ताकतीने येण्याचे आव्हानही केले होते. दरम्यान आज त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील ताजनापूर येथे ढोल ताशा बडवीत आनंद लुटला.
नगर जिल्ह्यातील ताजनापूर येथील भावांच्या प्रेमामुळे भारावून गेलो.. या गजी ढोलाच्या तालावर दंग होण्याएवढा आनंद कशात नाही. या हातांनीच कधी घुंगराची काठी घेऊन निसर्गावर प्रेम केलं, या हातांनीच कधीकाळी तलवार उचलून स्वराज्याचं रक्षण केलं.. pic.twitter.com/ynLjaDtqmF
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) May 28, 2022
ढोल बडविल्याचा व्हिडिओ ट्विटला शेअर करत गोपीचंद पडळकर म्हणाले, “अहमदनगर जिल्ह्यातील ताजनापूर येथील भावांच्या प्रेमामुळे भारावून गेलो. या गजी ढोलाच्या तालावर दंग होण्याएवढा आनंद कशात नाही. या हातांनीच कधी घुंगराची काठी घेऊन निसर्गावर प्रेम केलं, या हातांनीच कधीकाळी तलवार उचलून स्वराज्याचं रक्षण केलं. हेच हात आज गजी ढोलाच्या तालावर दंग होऊन संघर्षातही आनंद शोधतात. हेच हात उद्या आपल्या हक्कासाठी वज्रमूठ बांधतील. त्यामुळं नाद करा पण आमचा कुठं? बोला यळकोट यळकोट जय मल्हार… सदानंदाचा यळकोट… बिरोबाच्या नावानं चांगभलं…”
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

