Share

मंत्री दुष्काळ दौरे काढताना पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतात; वडेट्टीवारांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. यात सरकारवर वेगवेगळे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अर्थसंकल्पातील अनुदानासाठीच्या मागण्यांवर चर्चा करत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

या टीकेत त्यांनी राज्याचे मंत्री दुष्काळ दौरे काढत असताना पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतात. जनतेची कामे केली म्हणून उंट-घोड्यावर मिरवणूक काढून घेत आहेत असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. या आरोपाला उत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी दुष्काळ दौऱ्यासाठी मी रेल्वेने औरंगाबादला गेलो होतो. आचारसंहिता लागली असल्याने शासकीय गेस्ट हाऊस उपलब्ध नव्हते. त्यामुळे फक्त फ्रेश होण्यासाठी मी तासभर पंचतारांकित हॉटेलमध्ये गेलो होतो, असे स्पष्टीकरण दिले.

त्यावर तुम्हाला फ्रेश होण्यासाठी देखील पंचतारांकित हॉटेलच लागते का? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी विचारताच शेतकर्‍यांच्या मुलांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये जायचे नाही का? असा प्रतिप्रश्न सदाभाऊ खोत यांनी विचारला. तसेच माझी उंटावरून मिरवणूक जनतेने काढली होती. आम्ही काम केले म्हणून आमची मिरवणूक निघतेय. विरोधकांची तर तीही निघत नाही, असा टोमणा देखील खोत मारला मारला.

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!