Share

वरुण धवन बनला समंथाचा बॉडीगार्ड; म्हणाला तु घाबरू नकोस…

Published On: 

मुंबई : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिचेही सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही फोटोग्राफर्सनी घेरलेले दिसत आहेत. यादरम्यान वरुण धवनने असे काही केले आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याची खूप चर्चा होत आहे आणि हा व्हिडिओही जोरदार शेअर केला जात आहे.

वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहेत. या व्हिडिओमध्ये दोघेही फोटोग्राफर्सनी घेरलेले दिसत आहेत. यादरम्यान, मस्ती करताना वरुण धवन फोटोग्राफर्सना म्हणतो की तु घाबरू नकोस, तुम्ही कशाला घाबरवत आहात तिला ? वरुण धवनचा समंथा रुथ प्रभूला फोटोग्राफर्सपासून वाचवतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांना खूप आवडला आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी वरुण धवनचा पायही ओढायला सुरुवात केली आहे. असे मानले जात आहे की लवकरच दोघेही काही मोठ्या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत.

एका यूजरने लिहिले आहे की, तुम्ही खूप नम्र आहात. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, आधी रश्मिका आणि आता सामंथा. एका चाहत्याने वरुण धवनला दक्षिणेकडे जाण्याचा सांगितले आहे. काही  दिवसांपूर्वी वरुण धवनचे रश्मिका मंदानासोबतचे काही फोटोही समोर आले होते, ज्यामध्ये दोघेही खूप क्यूट दिसत होते. समंथा रुथ प्रभू आणि वरून लवकरच पडद्यावर एकत्र दिसणार असल्याचे मानले जात आहे. वरुण धवन समंथा रुथ प्रभूसोबत कोणत्या चित्रपटात दिसणार, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!