मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. फक्त इतकेच नाही तर मलिक यांच्या सुटकेसाठी निदर्शनेही करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दिला आहे.
यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, “देशद्रोही नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही”, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
देशद्रोही नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजपा स्वस्थ बसणार नाही !#NawabHataoDeshBachao pic.twitter.com/TYek75Gax5
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 12, 2022
दरम्यान, नवाब मलिकांचा राजीनामा घेण्यात यावा या मागणीसह काही दिवसांपूर्वी आझाद मैदानावर भाजपकडून मोर्चा काढण्यात आला. मोर्च्याचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. राणीची बाग ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. तसेच यावेळी हा संघर्ष देशद्रोह्यांविरोधात आहे. दाऊदच्या गुर्ग्यांविरोधात संघर्ष आहे. भारतमातेसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्यासाठी हा संघर्ष आहे. हे छत्रपतींचे मावळे आहेत, ते झुकणार नाहीत, वाकणार नाहीत, थकणार नाहीत, बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत व्यवहार करुन जेलमध्ये गेलेल्या नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कुमार केतकरांनी हास्यास्पद विधानं करू नयेत- देवेंद्र फडणवीस
- रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी देवेंद्र फडणवीसांना नोटीस!
- “सातबाऱ्यावर आदिवासींच्या मालकी हक्काची नोंद करू…”- रामदास आठवले
- वरुण धवल बनला समंथाचा बॉडीगार्ड; म्हणाला तु घाबरू नकोस…
- “उध्दवा अजब तुझे सरकार…”, केशव उपाध्येंचे टीकास्त्र


