Share

लातुरात दिव्यांगांसाठी ‘ड्राईव्ह टू दिव्यांग’ मोहीम!

Published On: 

लातूर: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच सर्वत्र लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात सुरु असून आता १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. मात्र आता ज्यांचा पहिला डोस झाला त्यांना दुसरा डोस देण्यात येत आहे. त्याच सोबत जिल्ह्यातील १२ हजार दिव्यांगांच्या लसीकरणासाठी ‘ड्राईव्ह टू दिव्यांग’ मोहीम जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमार्फत प्राधान्याने राबविण्यात येणार आहे.

भाजपा नेते आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सूचनेवरुन जिल्ह्यातील नोंदणीकृत १२ हजार दिव्यांगांच्या लसीकरणासाठी ‘ड्राईव्ह टू दिव्यांग’ मोहीम जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमार्फत प्राधान्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी ऑनलाईन सर्वसाधारण सभेत दिली. गुरुवारी ही बैठक पार पडली असून यात येथील कोविडच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला. तसेच लसीकरण मोहिमेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देखील लसीकरण करण्यात येणार असून याला ”ड्राईव्ह टू दिव्यांग’ असे नाव देण्यात आले आहे.

लातूर जिल्हा परिषदेने स्वत:चे ५० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज कोविड डेडिकेटेड सेंटर बारा नंबर पाटी येथे उभारले असून कोरोना रुग्णांना दर्जेदार सुविधा तेथे पुरवल्या जात आहेत. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेचे हे पहिलेच कोविड केअर सेंटर असावे, असेही जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यावेळी म्हणाले. या कोविड सेंटरसाठी जि. प.चे पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी यांनी २ कोटी रुपये जमा केल्याबद्दल अध्यक्ष राहुल केंद्रे व सर्व सभापती यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यास सर्वांनी अनुमोदन दिले. दोन कोटी रुपयांमधून प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका, जनरेटर, ऑक्सिजन आदींसह आवश्यक साहित्य खरेदी करण्यात येईल, असे यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी घोषित केले.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!