तीर्थपुरी: मतदारांनो दारू प्या, मटन खा पण बटन मात्र शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे दाबून नगरपंचायतीवर भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी रविवारी तीर्थपुरी येथील प्रचार सभेत केले. तीर्थपुरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची अनेक वर्षांपासून सत्ता होती. मात्र त्यांनी लाखोंचा विकासनिधी हडप केला. आता नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी मतदारांना हे पैशांचे अमिष दाखवत आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दडपशाही सुरु केली आहे. अशाप्रकारे त्यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले.
यावेळी ते म्हणाले, आता राजेश टोपे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. नगरपंचायत निवडणुकीत राजेश टोपे यांचे कार्यकर्ते शिवसेनेचे बॅनर खोडसाळपणाने जाळत आहेत. शिवसेना कार्यकर्त्यांवर दडपशाही करत धमक्या देत आहेत. पुढे पराभव दिसत असल्यामुळे असे गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तुम्ही अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेवू. आमच्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये ती ताकत आहे. तरी मतदारांनी अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भिक न घालता प्रस्थापितांना मतपेटीतून खदखद दाखवून देण्याची वेळ आली आहे.
नगरपंचायत निवडणुकीतील एकूण १३ उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी खा. जाधव यांनी केले. नगरपंचायतीवर भगवाफडकल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निधी खेचून आणून तीर्थपुरीचा विकास करण्याचे आश्वासन यावेळी जाधव यांनी दिले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख हिकमत उढाण म्हणाले, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या पंचवीस ते तीस वर्षाच्या कारकिर्दीत या मतदारसंघावर वर्चस्व असताना त्यांनी विकासकामे केली नाही. घनसावंगी नगरपंचायत मध्ये ८० कोटी रुपयांचा निधी शासनाकडून आणला. विकासकामे मात्र स्वतःच्या भावाला निधी देत गैरवापर केला. असे उढाण यावेळी म्हणाले. शेतकर्यांची अडवणूक करणार्या टोपेंच्या कारखान्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा लक्ष्मण वडले यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- गुलाबरावांच्या आव्हानाला नाथाभाऊंनी दाखवला आरसा, म्हणाले…
- आता बिले मिळणार ऑनलाईन घरपोच; औरंगाबाद पालिकेत चकरा मारण्याची गरज नाही..!
- “गुलाबरावांवर गुन्हा दाखल करा; अन्यथा गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही”
- ”गेंड्याच्या कातडीचं हे सरकार आहे, यांच्यात संवेदना उरलेल्या नाहीत”
- द्रविड गुरुजींनी घेतली कर्णधार विराट कोहलीची शाळा : पहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
