🕒 1 min read
औरंगाबाद :औरंगाबाद महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स या प्रकल्पाअंतर्गत आता शहरातील मालमत्ताधारकांना ऑनलाइन पद्धतीने बिले मिळणार आहेत. यासाठी महापालिकेची यंत्रणा अद्ययावत करण्याचे काम सुरू असून लवकरच याबाबत अधिक माहिती पोर्टलवर अपडेट केली जाणार आहे. त्यामध्ये मालमत्तेचा क्रमांक महापालिकेच्या पोर्टल वर टाकला जाणार आहे. मालमत्ता क्रमांकावरून नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने आपल्या मालमत्तेचे बिल मिळेल. त्यामुळे आता वारंवार महापालिकेत चकरा मारण्याची गरज उरणार नाही.
स्मार्ट सिटी प्रकल्पाचा एक भाग म्हणून, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने ई-गव्हर्नन्स प्रोजेक्टच्या अंमलबजावणीसाठी आणि शहरव्यापी जीआयएस सर्वेक्षणात मार्स टेलिकॉम आणि अॅम्नेक्सची नियुक्ती केली आहे. हे दोन्ही प्रकल्प महानगरपालिकेचा उत्पन्न वाढविण्यासाठी आणि नागरि केंद्रित सेवा सुलभ व वेगवान करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. ई-गव्हर्नन्स अंतर्गत महापालिकेच्या सर्व सेवा व मालमत्ता बिलांचा भरणाही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
त्यामुळे महापालिकेची वेळेची बचत होणार असून नागरिकांचा अमुल्य वेळ यापुढे वाया जाणार नाही. यामध्ये मालमत्ता धारकांचे मोबाईल आणि मालमत्ता क्रमांक लिंक करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये आत्तापर्यंत ३४ हजार ९४१ मालमत्ताधारकांचे क्रमांक अपडेट करण्यात आलेले आहेत. या सर्व प्रक्रियेनंतर मालमत्ता कराची बिले ऑनलाइन पद्धतीने मिळतील. येणाऱ्या नवीन वर्षात ई गव्हर्नन्सच्या प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाईल. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारीही सुरू केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केएल राहुल आणि राशिद खान लखनऊ संघात होणार सामील!
- …हा शहाणपण जमल्यास स्वपक्षीय राजू नवघरे आणि नवाब मलीकला सांगा- अतुल भातखळकर
- “माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले”
- आर अश्विन मुरलीधरनचा 800 कसोटी बळींचा विक्रम मोडू शकेल का?
- ”अजित पवारांनी त्यांचा राखीव सूट अमित शहांना देऊन महाराष्ट्राच्या संकृतीचे दर्शन दिले”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
